पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/72

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. mmmmmmm rammmmmmmmmmm डाव्या बाजूस धूप, हळदकुंकु, परिमलाच्या डब्या, आणि आगपेटी' असते. पंचामृत डाव्या हाताला असते. तांबूल, दक्षिणा, व फळे उजव्या हाताला असतात. फळांत नारळ, केळे, खारीक, व बदाम ही मुख्य आहेत. ऋतुपरत्वे इतर फळेही पूजेच्या वेळी देवाला अर्पण करतात. रोजच्या पूजेला फळांची अवश्यकता बहुधा नसते. सामान्यतः केशराचे किंवा चंदनाचे गंध पूजेला लागते. तथापि काही लोक आपल्या विशिष्ठ आराध्यदेवतेला विशेष प्रकारचे गंध अर्पण करतात. जसें गाणपत्य किंवा सौर-रक्तचंदनाचें; वीरवैष्णव-कृष्णागर किंवा काळे चंदन यांचें; इतर बैष्णव-तुलसीकाष्ठाचें; शांकर-बिल्ववृक्षाच्या खोडाचें. चंदनाचे परिमाण-देवांच्या मूर्तीची व गंध लावणाऱ्या पुरुषमंडळींची संख्या लहान मोठी असेल त्या मानाने कमजास्त गंध उगाळावे लागते. -__ अक्षता-अक्षता तांदुळाच्या वाहतात. त्या खंडित झणजे तुटक्या नसल्या पाहिजेत. कित्येक देवांना कुंकुम किंवा केशरीगंधमिश्रित अक्षता वाहतात. फुले-यांतच बेल व तुळसीपत्रे यांचाही समावेश होतो. देवांसाठी फुलें शक्य असल्यास स्वत:च्या बागेतून ताजी आणणे हा उत्तम मार्ग. बाजारांतून विकत आणणे हा मध्यम मार्ग आहे. एखा १ आगकाड्यांवर फास्फरस असल्यामुळे त्या पूर्वी देवपूजेत निषिद्ध मानल्या जात असत. हल्लीही कित्येक लोक देवघरांत आगपेटी न ठेवतां समई जळत ठेवतात. देवघरांत अंधार असेल तेव्हां संमई लावून ठेवणे चांगले.