पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/71

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. साहित्य मांडण्यासाठी, एक तबक फुलांसाठी, व एक भांडे पाणी सांडण्यासाठी ठेवावें. कोणत्याही समंत्रक पूजेला शंखघंटेची अवश्यकता असते. - पूजेचा कलश पूजा करणाराच्या डावीकडे आणि पूजाद्रव्य उजवीकडे ठेवावे असा नियम आहे. उपकरणी-पूजेची मुख्य उपकरणी ही आहेत-- (१) अर्ध्या हा शालुंकेच्या किंवा गोकर्णाच्या आकाराचा असतो; (२) पंचामृताच्या वाट्या, किंवा तपेल्या; ( ३ ) अभिषेकपात्र, व तें ठेवण्याची अडणी; (४) अक्षतांची व गंधाची तबकडी; (५) फुलांचे तबक; (६) धूपदान (धुपाटणे );(७) नीरांजन; (८) नैवेद्याचा पेला किंवा वाटी; (९) कापूर लावण्याची हलकार्ती; (१०) देवाचे अंग पुसण्याचे फडके. ही सर्व उपकरणी पूजेपूर्वी घासून, धुऊन किंवा नुसतीं स्वच्छ करून पूजेच्या पाटावर तयार असली पाहिजेत. हळदकुंकवाची डबी, कापराची डबी, वगैरेतले द्रव्य कमी झाल्याबरोबर त्या डब्या पुनः भरून ठेवाव्या.अगदी सरून पूजा करणाराने मागण्याची वाट पाहूं नये. उपकरणी वगैरे मांडतांना काही गोष्टी ध्यानात ठेवाव्या लागतात. त्या ह्या शंख पूजा करणाराच्या उजवीकडे व घंटा डावीकडे असतो. नैवेद्याचा पेला अगदी मध्यावर असतो. त्याच्या उजव्याबाजूस नीरांजन, त्याच्या जवळ हलकार्ती व त्यापुढे गंधाक्षता ही असतात.