पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/70

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० ३. किंवा दुसरा काही व्यायाम करतात. तरी यांपैकी व्यायामाचा जो प्रकार असेल त्याला लागणारे साहित्य व्यायामाच्या ठरलेल्या जागी तयार करून ठेवावें. पोथी-कित्येक स्नानसंध्येनंतर अध्यात्मरामायण, गीता, गुरुचरित्र यांचा किंवा दुसऱ्या एखाद्या पोथीचा नित्य नेमाने पाठ करतात. त्यांची वाचण्याची पोथी पाटावर ठेवावी. पाट इतका लांबरुंद असावा की त्यावर पोथी आणि तिची वाचलेली पाने उलटून ठेवतां येतील. पोथीवर सहज नजर पडेल इतकी पाटाची उंची असावी. सूचना-सूर्याला नमस्कार घालतेवेळी किंवा पोथी वाचण्याचे वेळी पूजेचे साहित्य लागते. ते ही जवळ तयार ठेवावें. पूजेचे मांडणे. पूजेचे साहित्य-ज्या प्रकारची पूजा असेल त्याप्रमाणे पूजेचें साहित्य केले पाहिजे. पूजेचे सामान्यतः दोन वर्ग आहेत. १ नित्य व २ नैमित्तिक. नित्य पूजेत लागणारे साहित्य नैमित्तिक पूजेला लागून शिवाय काही ज्यास्त लागते. वटसावित्री, मंगळागौरी,अनंतचतुर्दशी, ऋषिपंचमी, लक्ष्मीपूजन इ. पूजा या नैमित्तिक होत. या पूजांतील विशेष प्रकार येथे सांगता येत नाहीत नित्य ह्मणजे रोजच्या पूजेचे साहित्य येथे सांगतो. पूजेच्या साहित्यांत सामान्यतः पाणी, चंदन, अक्षता, पुष्प, धूप, आणि आरतीचे सामान (कापसाची वात, तूप,कापूर इ.) व नैवेद्य यांचा समावेश होतो.याशिवाय अर्घ्य, पंचामृत,परिमलद्रव्ये, महानैवेद्य, फल, तांबूल, व दक्षिणा हे पदार्थ कारणपरत्वे नैमित्तिक पूजेला लागतात. पूर्वतयारी-पूजेला बसण्यासाठी आसन,पाण्याचा तांब्या, व इतर भांडी संध्येप्रमाणेच लावून ठेवावी. याशिवाय एक चौरंग पूजा