पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. प्रकरण १ लें. आरंभीचे दोन शब्द. या संसारांत पुष्कळ वेळां आपणांस असे दिसून येते की आरोग्य, संपत्ति, विद्या व संतति या सर्वांची अनुकूळता माणसास असून ही घरांतल्या कामांची व्यवस्था नीटपणे पाहणारी अशी सुगृहिणी न लाभल्यामुळे त्या माणसाला लागावें तसे सुख लागत नाही. पुरुषाचा बहुतेक काळ आपापल्या उद्योगधंद्यांत जात असल्यामुळे व त्यानिमित्त त्याला दिवसाचा पुष्कळसा काळ घराबाहेर घालवावा लागत असल्यामुळे घरांतल्या कामावर देखरेख ठेवण्यास त्यास वेळ मिळत नाही. सुखवस्तु माणसाच्या घरांत नोकरचाकर पुष्कळ असतात. पण या नोकरांकडून व्यवस्थित रीतीने काम करून घेण्यास त्यांचेवर कोणातरी घरच्या माणसाची देखरेख लागते. कारण, पुष्कळ वेळां नोकर अप्रामाणिक, अंगचुकार आणि कामाची चालढकल करणारे असतात. सुदैवाने प्रामाणिक आणि खटपटी असे नोकर मिळाले तरी त्यांना काम करण्याची पद्धति ठाऊक नसते, ती त्यांना दाखवून त्यांचेकडून घरांतली कामें योग्य रीतीने करवून घेण्यास कोणी तरी घरचें मनुष्य असावे लागते. नाहीतर पैशापरी पैसा खर्च होऊन पुनः घरांत सगळी अव्यवस्था होते. असे घरचें मनुष्य गृहिणीशिवाय दसरे कोण असणार ? कारण, दिवसेंदिवस अनेक कारणामुळे आपल्या समाजांत विभक्तकुटुंबपद्धतिच ज्यास्त ज्यास्त प्रचारात ये