पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/67

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

६२ घरांतली कामें. anmainamaramhankar भांडी मांडणें- आसनाच्या पुढे संध्या करणाराच्या डाव्या हाताला पाण्याचा तांब्या, त्यावर तबकडी किंवा हात पुसण्याचे ओले फडके घालून ठेवावा. तें कांहीं नसले तर तामन त्यावरच ठेवावें. ताह्मनांत पंचपात्री किंवा पेला आणि त्यांत पळी ठेवावी. एरव्ही ही भांडी तांब्याच्या उजवे बाजूला खाली ठेवावी. पंचपात्रीत किंवा पेल्यांत पाणी ओतून उघडे ठेवू नये. भस्म--हें अग्निहोत्राचे किंवा स्मार्ताग्नीचे असावें. एखाद्या बनातीच्या पिशवीत किंवा डब्यांत घालून ठेवलेले असावे, आणि तें संध्या करणाराच्या उजव्या हाताला ठेवावें. लहानशा मडक्यांत भस्म भरून ठेवून ते मडके संध्येच्या वेळी पुढे करणे अभद्र समजतात. भस्माची चिमटी तबकडीत घालून ठेवण्याचीही चाल आहे. गंध-गंधाचे नुसते सामान ठेवण्यापेक्षां गंध उगाळून तें तबकडीत भरून ठेवणे अधिक चांगले. गंधा जवळ एक निर्मळ आरसा ठेवावा. गंधाची तबकडी आरशावर ठेवू नये. बाजूला ठेवावी. चंदनाच्या ४ जाती प्रसिद्ध आहेत.त्या ह्या-१श्रीखंड ( पांढरें ), २ पीतचंदन (मलयागरु). ३ रक्तचंदन (हें तांबडे असून त्याला वास नसतो ) आणि ४ कुंकुम. चंदनाचे खोड चांगले आहे की वाईट तें नाकाला खोड लावून पाहूं नये. असें चंदन देवपितृकार्याच्या उप १ गृहस्थाने विवाहाग्नीचे योग्य प्रकारे रक्षण करून रोज होम करावा असा नियम आहे. अग्निहोत्रही एक उपासना आहे. तीत पांच किंवा तीन अग्नि बाळगून त्यांत हवन करावयाचे असते. अग्निहोत्र्याच्या घरून भस्म आणितेवेळी पंचपात्रीत तांदूळ पाठवून ते आणावें. तसें फुकट परिश्रम देऊ नयेत. २ वैष्ण वसंप्रदायी लोक बहुधा भस्माऐवजी गोपीचंदन वापरतात. ह्मणून वैष्णवाच्या संध्येला गोपीचंदनाचा खडा ठेवावा. शैव एखादेवेळी गोपीचंदन लावतील, पण वैष्णव भस्म कधी लावावयाचे नाहीत, हे ध्यानात ठेवावें. गोपीचंदन यांत जरी चंदन हा शब्द आहे, तरी ती खरोखर माती आहे.