पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/66

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. चांदीचीही चालतात. जर्मन सिल्व्हर व अल्युमिनमची घेण्याचाही प्रघात पडला आहे. इतर धातूंचीं, इनामेल्ड (वरून रोगण लावलेली ), चिनीमातीची किंवा काचेची भांडी घेण्याची वहिवाट नाही. संध्येची भांडी पाणी प्यालेली असतील तर ती संध्येला ठेवण्यापूर्वी घासली पाहिजेत. ही भांडीही ज्याची त्यास ठेवावी. बदलू नयेत. ताम्हनाची अवश्यकता अर्ध्याकरितां असते. कारण अध्ये पाण्यांत किंवा भांड्यांत टाकावी असा नियम आहे. हाच नियम तर्पणालाही लागू आहे. पळीचा उद्देश पाणी बेताचे घेता यावे हा आहे. आचमनाला थोडें नियमित पाणी लागते. ह्मणून पळी मोठी असूं नये, आणि पंचपात्रींत ठेविली असतां भाराने ती लवंडेल इतकी जडही ती नसावी. पंचपात्र किंवा पेला मोठा असला तर तेवढे पाणी संध्येला खरोखर पुरे होते. तथापि आचमन करून उरलेले पाणी दुसऱ्या कर्माला घेऊं नये असा नियम असल्यामुळे पाण्याचा तांब्या निराळा ठेवावा लागतो. ज्यांस संध्येनंतर ब्रह्मयज्ञ, तर्पण वगैरे करावयाचे असते त्यांसही त्याकरितां पुष्कळ पाणी लागते. तेव्हां संध्येसाठी तांब्या ठेवावा हे चांगलें. तांब्या, पंचपात्र व पळी या तिन्हींचें काम एकट्या झारीने उरकतें. ह्मणून पुष्कळ लोक झारी घेतात. पुष्कळ पाणी ज्यांना लागते ते झारी घेऊन शिवाय जवळ पाण्याची लहानशी कळशी ठेवतात. पाणी---संध्येला पाणी पारोसें, पारोशाने आणिलेलें, पारोशाचा स्पर्श झालेले, किंवा पिण्यावापरण्याच्या कामांत येऊन उरलेलें असें उपयोगी नाही. तीर्थजलाला मात्र पारोशाचा दोष नाही. १“वयं पर्युषितं पुष्पं वयं पर्युषितं जलम् । न वयं तुलसीपत्रं न वl तर्थिजं जलम् ॥'