पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १० वें. wwwxxxxw anawwwww योगी राहत नाही. ते कशावर तरी घासून पहावें. गंध उगाळतांना त्यांत कित्येक लोक केशर, कस्तुरी वगैरे सुवासिक पदार्थ घालतात. गंध उगाळणे झाले झणजे सहाणखोड धुऊन खालच्या जागेवर लागलीच पाण्याचा हात फिरवावा, ह्मणजे भुईवर चंदनाचे डाग पडलेले राहणार नाहीत. ___सामान्यतः रव्याचे तांबडे गंध लावण्याचा प्रघात आहे. हे गंध देवांच्या व पितरांच्या पूजेला चालत नाही. ते फक्त पुरुषांनी कपाळी लावण्याच्या उपयोगाचे असते.रवे हळकुंडाचे करतात.हळकुंड सरळ, व बिनगांठीचे पाहून घेतात व त्यास लिंबांचा रस आणि पापडखार यांत कित्येक दिवस भिजत ठेवतात. ह्मणजे तें आंतून चांगले लाल होतें. कित्येक दुकानदार रवा चांगला लाल दिसावा ह्मणून त्यास हिंगुळाची पुटे चढवितात. हा रवा वाईट असतो. तेव्हां दुकानांतून रवा घेतांना तो नीट पाहून घ्यावा. कित्यक अल्लड मुले रव्याच्या गंधाला तुकतुकी यावी ह्मणून तो दुधांत,आंब्याच्या रसांत किंवा साखरेबरोबर उगाळतात. काही लोक काडीने किंवा ठशाने गंध लावतात. कोणाचा मुद्रा लावण्याचा प्रघात असतो. वैष्णवांत मुद्रा लावणे हे धार्मिक कर्तव्य समजतात. या मुद्रा बहुधा गोपीचंदनाच्या असतात. कित्येक लोक केशराचे गंध लावतात.केशर रोजच्या रोज खलून घेण्यापेक्षा एकदांच चांगले काजळासारखें खलून त्याच्या लहान मोठ्या गोळ्या करून ठेवणे सोयीचे असते. पुण्याकडे अशा गोळ्या बाजारांत आयत्याही मिळतात. चंदनाचे पांढरें गंध देवपूजेसाठी व लावण्यासाठी उगाळले असते. तें लावून उरल्यास त्यांतले पाणी फडक्याने टिपून गोळ्या करून