पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/65

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. संध्येचे मांडणें-संध्यावंदनाला पुढील सामान लागते. तें सर्व ठराविक जागी नीट जुळवून यथायोग्य रीतीने मांडून ठेवावे. संध्येचे सामान झणजे-आसन, भांडी, भस्म, चंदन. इ० आसन--संध्येला नुसता पाट घेणे शास्त्राला धरून नाही. भुईवर किंवा काष्टपाषाणावर बसून संध्या करूं नये असे शास्त्रांत सांगितले आहे. संध्येसाठी दर्भाचे किंवा लोकरीचे आसन घालावें. हे जमीनीवर, पाटावर किंवा शिळेवर घालावे. _आसनाच्या लांबीरुंदीचे काही परिमाण नाही. तरी साधारणपणे त्यावर मांडी घालून चांगले बसतां येईल येवढ्या लांबीरुंदीचें तें असावें. आसन पूर्वाभिमुख (पूर्वेकडे तोंड करून ) किंवा उत्तराभिमुख ( उत्तरेकडे तोंड करून ) मांडावें. ज्याचे आसन त्यासच मांडावें. अदलाबदल करूं नये. संध्येचे आसन संध्ये शिवाय इतर कामाला घेऊ नये. संध्येपूजेचे वेळी कोणी भेटण्यास येतात. त्या माणसाला बसण्यासाठी एखाद दुसरा पाट किंवा आसन निराळे जवळ असू द्यावे. भांडी-तांब्या, पंचपात्र, पळी व ताम्हन येवढी भांडी संध्येला अवश्य आहेत. ही भांडी तांब्याची असलेली उत्तम. पितळेची व । १ दर्भाच्या जुड्या आडव्या ठेवून त्यांत उभी सुमळी घालून हे तयार केलेले असते. उत्तरहिंदुस्थानांत काशीकडे दर्भासनाचा प्रचार फार आहे. २ लोकरीचे आसन बारीक असलेले चांगले. बनातीच्या तुकड्याला संजाब व काठकोर वगैरे लावून ही तयार केलेली असतात. कोणी मृगचर्मही आसनासाठी घेतात, आणि कोणी तिन्ही ही घेतात. तिन्ही घेतल्यास आधी कुशासन (दर्भासन ), त्यावर मृगचर्म आणि त्यावर लोकरीचे आसन घालतात. व्याघ्रचर्म संध्येपूजेला वर्ण्य आहे.