पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/63

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५८ घरांतली कामें. घालावें; पण धडधाकड, आळशी किंवा चारगट माणसाने मागितल्यास काही एक न बोलतां मुकाट्याने ऐकले न ऐकलेसे करून घरी यावें. सोबतिणीशी किंवा ओळखीच्या माणसाशी उगाच इकडच्या तिकडच्या गोष्टी करीत वेळ घालवू नये. अशा गोष्टी करणेच झाले तर अगदी हलक्या आवाजाने कराव्या, व त्या करतांना दुसऱ्याची निंदा करणे किंवा स्वतःच्या घरची छिद्रे उघड करणे हे तर फारच वाईट. रस्त्याने चालतांना उगाच इकडे तिकडे बघत जाऊ नये. तसेंच वाटेंत दिसला महादेव घाल त्याला पाणी, वड किंवा पिंपळ दिसला की घाल त्याला प्रदक्षिणा, असें करूं नये. या गोष्टी भाविकांच्या दृष्टीने पुण्यकारक असतील. पण पुण्यकृत्य करतांना सुद्धां तारतम्य हे ठेविलेंच पाहिजे. बायकांनी रस्त्याने जातांना गुडघ्याच्या वरचा पायाचा भाग, छातीचा भाग, आणि डोकें ही चांगली झाकावी. डोकींची, वेणींत घातलेली फुलं वगैरे अशा वेळी दिसूं देऊं नयेत. पायांत जड साखळ्या, मोठाली भरीव जोडवी, शब्द करून लोकांचे चित्त आकर्षणारी पैंजणे, घागऱ्या वगैरेही घालू नयेत. नाकात नथ असण्याची सुद्धा अवश्यकता नाही. ती आडांत किंवा नदीतळ्यांत एखादे वेळी पडण्याचा संभव आहे. गळ्यांत सरी, माळा वगैरे अलंकारसुद्धां नसलेले चांगले. असलेच तर निदान त्यांचे प्रदर्शन तरी नको.