पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/62

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९ वें. ५.४१४/ wwwwwwwww nanaman घाटावर शून्य असतां एकटें दुकटें आणि मूकस्तंभ जाऊ नये. घाटावर शेवाळ किंवा घसरण झाली असेल तेथे फार जपून पाऊल ठेवावें. पिण्याचे पाणी ज्या जलाशयांतून घेत असतील तेथे कपडे धुऊं नयेत, किंवा निर्माल्याची फुलें, तुटकी जानवीं, किंवा केरकचरा टाकू नये. जळके किंवा राखमाती लावलेले भांडे अशा पाण्यात बुडवू नये. त्यांत स्नान करू नये. बाहेरून पाणी आणावे लागते तेव्हां तेथें साहजिकच पुष्कळ स्त्रीपुरुषांची गांठ पडते. त्यांतले कित्येक रिकामटेकडे गंमत पाहण्यासाठी किंवा बायकामाणसांच्या चेष्टा करण्यासाठी किंवा चारगटपणा अगर गप्पागोष्टी करण्यासाठी आलेले असतात. अशांचा संसर्ग शक्य तेवढ्या उपायांनी टाळला पाहिजे. यासाठी होतां होईल तों आपण स्वतः अगदी सभ्यपणाची वागणूक ठेवावी. कोणाशी बोलण्याचालण्याचा प्रसंगच येऊ देऊं नये शक्य असल्यास बायकांनी बायकांच्या व पुरुषांनी पुरुषांच्या घाटावर जावें. गर्दीच्यावेळी अगर अगदी पाहटेस किंवा अगदी संध्याकाळी एकटें जाऊ नये. काम लवकर उरकून घरी परत यावे. आपण विनाकारण जागा अडवून दुसऱ्याचा खोळंबा करूं नये. उच्चनीचतेबद्दल वाद घालीत बसू नये. आपल्या आचरणावरून लोक आपणांस मान देतील तो खरा; मान मागण्याने मिळत नसतो; त्यासाठी वाद घालीत बसण्याने उलट उपमर्द होण्याचा मात्र संभव असतो. दुसन्याची दोरी किंवा भांडे अथवा दुसरी एखादी वस्तु त्याच्या परवानगीवांचून घेऊ नये. होतां होईल तो ती मागूच नये. एखाद्या आंधळ्यास, पांगळ्यास, किंवा तान्हेल्यास त्याने पाणी मागितल्यास