पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/61

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. (९) पाण्याची भांडी होईल तोपर्यंत घडवंचीवर किंवा उंच जागी ठेवलेली असावी. त्याचे भोवती गाळ, केरकचरा किंवा वर जाळी वगैरे होऊ देऊ नयेत. (८) घेण्यास योग्य पाणी-ज्या पाण्याचा उपसा होत असेल किंवा जे वाहत असेल असे पाणी घेण्यास योग्य. साचलेलें, दुषित, किंवा गढूळ पाणी घेऊ नये. पावसाळ्यांत सगळेच पाणी गढूळ होते. तेव्हां ते घेतल्याशिवाय गत्यंतरच नसते. अशावेळी दोनपदरी किंवा चारपदरी वस्त्राने ते गाळून घ्यावे, किंवा निदान एक तास गढूळ पाणी तसेंच राहू देऊन मग वरचे पाणी हलक्या हाताने ओतून घ्यावे. तुरटीचा खडा पाण्यात फिरवावा आणि मग तासभर ते तसेंच राहू देऊन गाळ खाली बसल्यावर वरचे पाणी म्यावे. पिण्याच्या पाण्यासाठी नेहमी फिल्टरचा उपयोग करावा. पाण्यास वास असेल तर पिण्याचे पाणी उकळून व गाळून प्यावे. पिण्याचे पाणी ठेवण्याला आंतून बाहेरून स्वच्छ अशी तांब्याची भांडी उत्तम. अशा भांड्यांतले पाणी सुद्धां नेहमी गाळून पिण्याची संवय ठेवावी. (९) कित्येक सामान्य गोष्टी--गळके भांडे पाणी भरण्यास घेऊ नये. त्यास झाळ द्यावयास पाहिजे असेल तर ज्या धातूचें ते भांडे असेल त्याचाच द्यावा. टिनचा किंवा कथलाचा देऊ नये. झाळ देण्याची व्यवस्था होईपर्यंत राळ व मेण एकत्र करून त्याने बाहेरून भोंक बंद करावें. - ज्या तळ्याची किंवा नदीची माहिती नसेल किंवा ज्यांत हिंस्र जलचर प्राणी ( मगर, सुसरी, सर्प वगैरे ) राहत असतील, त्यांत पाणी घेण्यासाठी एकदम शिरूं नये. अंधार असतांना किंवा