पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९ वें. wwwwwwwwww विहिरीच्या तोंडाशी लाविलेल्या फिरकीवरून पाणी काढण्यास माणसास ओणवे व्हावे लागते आणि फार वेळ तसें राहावे लागले तर कंबर दुखते. उंच लावलेल्या फिरकीवर इतका त्रास पडत नाही. फिरकी ज्या आडव्या दांड्यावर बसविली असते तो फार लांब नसला पाहिजे.नाहीतर ती फिरकी दांडाभर नाचत फिरते.त्या फिरकीच्या मधला खोलगटा त्यांत दोरी चांगली फिरेल असा व खोल असला पाहिजे. नाहीतर दोरी त्याच्यावरून खाली घसरते आणि ती दरवेळी फिरकीवर बसविण्यांत वेळ जातो. हाताने खेचून पाणी काढण्यापेक्षां फिरकीवरून पाणी ओढण्याचे काम कमी श्रमाचे व कमी धोक्याचे असते. रहाटाने पाणी काढण्याचे काम त्याहून सोपे असते. रहाट लाकडी किंवा लोखंडी असतो, आणि त्याच्या दोन्ही अंगांस हाताने धरण्यासाठी खुंट्या असतात. आलटून पालटून दोन्ही अंगांला काम केले ह्मणजे शरीराच्या एकाच अंगावर जोर पडत नाही. या खुंट्या धरून पाणी काढतांना वाकू नये. दोरीच्या फांसाला भांडे अडकवून विहिरीत सोडले ह्मणजे त्याला आंत लोटण्याचे काम रहाट स्वतःच करीत असतो. परंतु त्याने भांडे एकदम आदळून दोरीलाही हिसका बसतो. ह्मणून दोरी थोडी सैल करून ती हाताच्या मुठीच्या पोकळीतून जाऊं द्यावी, किंवा ती सुटत असतां खुंट्यांना हात द्यावा. फिरकी व रहाट दोहोंची आंसाची टोके खांबावर जेथें टेकलीं असतात, तेथे दोनतीन दिवसांनी ओंगण दिले पाहिजे. झणजे आवाज होत नाही व पाणी ओढण्यास जडही जात नाही.