पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/57

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. पाणी ओढण्याला दोरी लागते. पाणी काढण्याला योग्य दोरी ह्मणजे सण, अंबाडी, नारळीचा काथ्या, किंवा कापसाचे जाड सूत यांची होय. कापसाच्या सुताची दोरी महाग पडते व तितकी मज- . वृतही नसते. लहानसान गडव्याने पाणी काढण्याला ती चांगली. अंबाडीची, नारळाची किंवा सणाची दोरी प्रापंचिकांना चांगली. अंबाडीची दोरी दोन चार महिन्यांत कुजून तुटते. नारळाची दोरी पाण्यात भिजल्याने मजबूत होते, पण फार खोल पाण्याला ती उपयोगी नाही. सणाची दोरी मात्र केव्हाही सारखीच उपयोगी पडते. ती बेताबाताने वापरली, आणि जपून वागविली तर टिकतेही पुष्कळ. दोरी पाण्याच्या अंतरापेक्षां तीन चार हात तरी अधिक असली पाहिजे. कारण, केव्हां केव्हां पाणी फार खोल जाते. शिवाय फांसांत दोरी बरीच तुटते, व वरचेवर नवा फांसा करण्यांत ती खर्च होते. रहाट किंवा फिरकी यांच्या साह्यावांचून नुसत्या हाताने पाणी खेचन वर काढणे हे फार श्रमाचे काम आहे, आणि यांत भांडे. सोडतांना व वर घेतांना तें आदळण्याची, व एखादे वेळी स्वत:चा झोंक विहिरीत जाण्याची भीती असते. हाताने पाणी खेचून काढण्याला भांडे लहान व हलके आणि दोरी बारीक पाहिजे. मोठ्या बायकांनी थोड्या अंतरावरचे पाणी अशा रीतीने प्रसंग विशेषी काढावे, पण लहान मुलींना हे उपयोगाचे नाही. कांही विहिरीवर तिच्या तोंडावर खाली किंवा उंचीवर लोखंडी किंवा लाकडी फिरकी (लहानसें चक्र ) बसविली असते. ही फिरकी. हात सहज पोचेल इतक्या बेताची असली तर तिचा कांहीतरी उपयोग होतो. पण हात पुरत नसला तर काही उपयोग होत नाही.