पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/59

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५४ घरांतली कामें. -५ पाणी ओढण्याला व वाहण्याला सगळ्या भांड्यांत घागर ही फार सोयीची आहे. तोंड अरुंद असल्यामुळे पाणी काढतांना तिच्या तोंडांतून ते फारसें सांडत नाही, व हाताने उचलण्यालाही ती सोयीची असते. ६ पाणी काढण्याची व वाहण्याची दुसरी भांडी झणजे बालटी किंवा बादली, आणि पोहरे. खोल जागेतून पाणी काढण्याला घागर उत्तम. मात्र ती लहान घेतली पाहिजे. त्याहून कमी अंतरावरच्या पाण्याला पोहोरे आणि अगदी जवळच्या पाण्याला बादली घ्यावी. प्रवासांत क्यानव्हसचे केलेले पोहरे अधिक सोयीचे असतात. ७ पाणी साठविणे-घरांत एकवेळ पुरण्याइतके पाणी नेहमी भरलेले पाहिजे. घरांत नळ किंवा आड नसला तर चोवीस तास पुरेल इतकी पाण्याची बेगमी करून ठेवावयास पाहिजे. घरांत खाऱ्या पाण्याचा आड असला तर वापरण्यास खारे पाणी घेऊन पिण्यापुरते व स्वैपाकापुरते पाणी शेजारपाजारच्या आडावर किंवा नदीवर भरले पाहिजे. शेजारपाजारच्या आडावर पाणी भरण्यास जाणे तें भलत्या वेळी जाऊन दुसऱ्यास अडचण न होईल अशा रीतीने भरावें. पाण्याची बेगमी करतांना कित्येक गोष्टी लक्षात ठेविल्या पाहिजेत. त्या अशाः (१) पारोशाने आणिलेले पाणी आणि स्नान केल्यावर आणिलेले पाणी ही दोन्ही एक करूं नयेत. पारोशाने आणिलेले पाणी संध्येप्रजेला व ज्याचा नैवेद्यवैश्वदेव व्हावयाचा आहे अशा स्वैपाकाला चालत नाही. (२) पाणी भरल्यावर एक रात्र उलटून गेली ह्मणजे तें शिळे होते. असे पाणी पिण्याच्या व स्वैपाकाच्या उपयोगांत होतां होईल तों आणूं नये.