पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/56

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९ वें. ५१ पद्धतींत झणजे डोक्यावर पाणी आणण्यांत दोन्ही हात मोकळे राहतात, अंगाच्या एकाच भागावर ओझें पडत नाही व चाल सरळ . राहते, हे गुण आहेत. पण सतत डोक्यावर पाणी वाहण्याने मेंदूला विकार घडण्याचा संभव आहे. भारवाहक स्त्रियांची संतति मतिमंद निपजण्याची भीति असते. शिवाय डोक्यावरच्या भांड्यांना धक्का लागून पडण्याचा संभव असतो. कमरेवरच्या घागरीचे तसे नाही. महाराष्ट्रीयांच्या पद्धतींत भांडे स्त्रियांच्या पूर्ण स्वाधीन राहते. कमरेवर घागर घेण्यांत एकमोठा दोष हा आहे की घागरीतले पाणी हिसळून त्यामुळे नेसलेले लुगडे भिजतें, आणि असें सतत होत गेले तर त्यापासून शैत्याची बाधा होण्याचा संभव आहे. पण घागर अगदी तोंडापर्यंत न भरतां गळ्यापर्यंत भरली तर हा दोष टाळतां येण्यासारखा आहे. ३ पाणी भरण्याच्या कामांत तीन पोटकामें सामिल आहेत । १ पाणी भरणे, २ ते वाहून आणणे, आणि ३ तें साठवणे. पाणी भरण्याचे प्रकार दोन. एक प्रत्यक्ष हाताने भरणे आणि दुसरें तें ओढून घेणे. पाणी नळाचे भरणे असेल किंवा जलाशयाच्या पाण्याची सपाटी जमिनीबरोबर किंवा उंच असेल आणि हाताने पाणी सहज घेतां येईल तेथें हाताने ते घेणे सोईचे असते.पण पाण्याला पोचण्याला पायऱ्या उतरून जावे लागेल आणि त्या पायऱ्या अरुंद किंवा इतर रीतीने धोक्याच्या असतील तेथे हाताने पाणी भरण्यास न जातां दोरीने ते ओढून घेणे चांगले. ४ पाणी ओढणें-पाण्याची सपाटी जमिनीपासून ३० फुटांपर्यंत खोल असेल तोपर्यंत पाणी ओढणे येवढे कष्टाचे होत नाही. ३० पासून ४० पर्यंत पाणी ओढणे श्रमसाध्य, ४० पासून ६० फुटांपर्यंत कष्टसाध्य व त्यापुढे बायकांना ते अशक्य होते.