पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/55

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

५० घरांतली कामें. निर्मित जलप्राप्तीची साधने असली तरी त्या जलाशयापासून घरापर्यंत पाणी वाहून आणावे लागते. हीही अडचण नळासारख्या उपायाने मनुष्याने दूर केली आहे. २ नद्या, तळी, विहिरी, वगैरे जलाशयापासून घरांत पाणी आणण्याचे काम स्त्री व पुरुष दोघांनाही करावे लागते. पण दोघांचे प्रकार वेगवेगळे आहेत. पुरुषांनी पाण्याचे भांडे खांद्यावर किंवा हातांत धरून नेण्याचे पतकरलें. पुढे कावडीने पाणी आणण्याची युक्ति निघाली. कांही लोक जनावराचे पाठीवरून पाणी नेऊ लागले व पुढे याकामासाठी बैलगाड्या, हातगाड्या वगैरेंचा उपयोग लोक करू लागले. बायकांना खांद्यावरून पाणी वाहून नेणे आवडले नसावें. पुरुषांचे खांदे बहुधा रुंद असतात व छातीत शक्तिही ज्यास्त असते, त्यामुळे पुरुषांनी खांद्यावर घागर घेणे किंवा हातांच्या स्नायूंत अधिक शक्ति असल्यामुळे हाताने लोंबकळत धरून नेणे पतकरलें तें ठीकच आहे. स्त्रियांच्या शरीराचा रुंद व मजबूत भाग खांदा व छाती नसून कमर किंवा तिच्या खालचा भाग हा असतो, त्यामुळे त्यांना कमरेवर घागर घेणे अधिक सोयीचे वाटते, असे आपल्या महाराष्ट्रीय स्त्रियांच्या उदाहरणांवरून दिसते. पण सर्व स्त्रियांसंबंधाने हा सामान्य नियम ह्मणून मात्र सांगता येणार नाही. कारण माळवी आणि गुजराथी बायका डोक्यावरून पाणी आणितात.स्त्रियांच्या आचारांत देशपरत्वे हा जो फरक झाला, त्यामुळे त्यांच्या वेणी घालण्याच्या पद्धतीत, शिरोभूषणांत, आणि चालण्याच्या ढबींतही बराच फरक पडला आहे. तो सोडून शारीरिक सुखदुःखांचा आणि सोयीगैरसोयींचा विचार केला तर असे दिसून येते की महाराष्ट्रीय स्त्रियांच्या पद्धतींत गुण अधिक व दोष कमी आहेत. माळवी आणि गुजराथी स्त्रियांच्या