पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ९ वें. naaaaa रंगीत वस्त्रे फार कडक उन्हांत वाळत घालूं नयेत. त्याने त्यांचा रंग फिका पडतो. वस्त्र लवकर वाळावे ह्मणून केव्हां केव्हां तें विस्तवावर धरतात. असे करण्याने तें हडकतें, पण सुके वाळत नाही. शिवाय अशाने वस्त्र धुरकटण्याचा व एखादे वेळी ठिणगी उडून जळण्याचाही संभव असतो. हिवाळ्यांत व पावसाळ्यांत लहान मुलांचे कपडे लवकर वाळत नाहीत, तेव्हां ते विस्तवावर वाळविण्याचा प्रसंग येतो. अशावेळी एक युक्ति करतात. ती अशी की ज्यांतून धूर निघत नाही आणि ठिणग्या वगैरे उडत नाहीत अशा कोळशांच्या विस्तवावर एखादा बांबूचा गोल व उंच घुमटासारखा हारा घालून त्यावर कपडे पसरून ठेवतात. ह्मणजे ते आंतील उष्णतेने लवकर वाळतात. नदीच्याकांठी वाळवंटांत वगैरे वस्त्रे वाळत घालण्याचे काम पडले तर जनावरें किंवा माणसें वर पाय देऊन जाणार नाहीत अशा व स्वच्छ जागी घालावी, आणि त्यांवर नजर ठेवावी. नाहीतर भामटे ती उचलून नेतील. कांटेरी झाडांवर वस्त्रे वाळत घालू नयेत. काढतांना वस्त्रे फाटण्याची फार भीति असते. प्रकरण ९ वें. पाणी. १ पाणी हे मनुष्याच्या जीवनाला अवश्य आहे. त्यावांचून त्याचे एक दिवसही चालावयाचे नाही. ह्मणून मनुष्यांची वस्ती नेहमी पाण्याच्या आश्रयाने होते. जेथें सृष्टिनिर्मित जलाशये नसतात तेथें मनुष्यप्राणी स्वत:च्या बुद्धीने तलाव, विहिरी, कालवे, यांसारखी जलप्राप्तीची साधने निर्माण करून राहतो. सृष्टिनिर्मित किंवा मनुष्य