पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४८ घरांतली कामें. (१७) धुतांना स्वत:च्या व दुसऱ्याच्या अंगावर शिंतोडे उडूं देऊ नयेत. ४ धुण्याच्या कामा नंतर वस्त्रे वाळत घालण्याचे एक काम असतें. हे करतांना काही गोष्टी लक्षात ठेविल्या पाहिजेत. त्या ह्या-धोतरें, उपरणी, व रुमाल, तसेंच लुगडी व चोळ्या ज्याची त्याची जोडीने दांड्यांवरून किंवा दोन्यांवरून वाळत घालावी. एकीकडे धोतर आणि लांब अंतरावर त्याचे उपरणे किंवा एका ठिकाणी एकीचे लुगडे आणि तेथून बरेंच दूर तिची चोळी असें घालू नये. दांडीवर, दोरीवर किंवा खुंटीवर वाळत घालण्यापूर्वी त्यावरचा मळ किंवा धुराळा चांगला हलवून किंवा पुसून काढावा. धूर लागेल किंवा धुराळा उडेल अशा जागी वस्त्रे वाळत घालूं नयेत. धुराने कपड्यावर पिवळा रंग चढतो, आणि कडू वास येतो. ऊन किंवा वारें लागेल अशा जागी वस्त्रे वाळत घालावी. वस्त्रे इतक्या उंचीवर वाळत घालावी की कोणी माणसाने हात सहज वर केला असतां तो हात वस्त्रांना लागू नये. नाही तर सोवळ्यांतली वस्त्रों ओवळी होऊन पुनः ती धुण्याची पाळी यावयाची. गच्चीवर वाळण्यासाठी वस्त्रे आंथरली तर वाऱ्याने ती उडून जाऊ नयेत ह्मणून त्यांवर दडपणे ठेवावी. गच्चीच्या.वरवंडीवर घातली तर वाऱ्याने उडून खाली पडणार नाहीत, पडलीच तर निदान आंत. गच्चीवर तरी पडतील, अशा बेताने घालावी. झणजे त्यांचा अर्धा अधिक भाग गच्चीकडे असावा, व कमी भाग बाहेर सोडावा. वरवंडीवर किंवा सज्ज्यांत वस्त्रे वाळत घालावयाची ती अशी घालावीं की खालून जाणारा येणाराला ती सहज ओढून घेतां येऊं नयेत.