पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/52

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. ४७ काही वेळ बुचकळून ठेविली तर त्यांचा बराच मळ निघून जातो. नंतर ती थंड पाण्यांत नुसती हातांनी चोळून स्वच्छ करावी. लोकरीची वस्त्रे कधीही जोराने पिळू नयेत. त्यांतले पाणी काढणे तर ती एका पाटावर ठेवून त्यांवर दुसरा पाट घालून वर उभे राहावे किंवा जड वजन घालावें ह्मणजे वस्त्रांतले पाणी निघून जाईल. (१२) धुण्याची जागा आड किंवा विहीर यांच्या तोंडाशी असेल तर वस्त्रे धुतांना पाण्याचे शिंतोडे किंवा धुण्याचे पाणी त्या आडांत किंवा विहिरीत न जाईल अशी खबरदारी घ्यावी. धुण्याचे पाणी विहिरीत न जातां लांब वाहून जाईल असा त्या पाण्याचा पाट काढून द्यावा. (१३ ) ज्या घाटावर किंवा तळ्यावर वाटेल त्या लोकांनी जाण्यायेण्याचा किंवा बायकापुरुषांनी जमण्याचा काही निबंध नसेल, ज्याच्या शेजारी बाजार, किंवा चवाठ्याची जागा असेल आणि सर्व त-हेचे लोक जमत असतील, किंवा याच्या उलट जी जागा अगदी एकीकडे व वस्ती पासून दूर असेल, अशा ठिकाणी एकटें धुण्यास जाऊ नये. (१४ ) धुण्याचे काम होतां होईल तो स्नानाचे पूर्वी उरकून घ्यावें. धुण्याकरितां थंडीचे वेळी पाण्यांत फार वेळ वावरणे अपायकारक आहे हेही त्याबरोबर लक्षात ठेवावे. हिवाळ्यांत हे काम उन्हाचे वेळी करावें, पण जेवण झाल्यानंतर लागलीच करूं नये. तिसरे प्रहरी करावें. (१५) धुण्याची वस्त्रे पुष्कळ असतील तर ती धुण्याचे आधीं व नंतर मोजून बरोबर आहेतना हे पाहावें. (१६) धुतांना तोंड उघडे ठेवू नये. ओठ मिटून घ्यावे.