पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/51

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें.. होते, आणि तें वस्त्र बारीक विरळ असले तर त्याचे सूत फुगून तें सारखें भरते. इतके झाल्यावर मग ते वरचेवर पाणी बदलून दोन चार वेळां धुवावें ह्मणजे झाले. वस्त्र जर फार अवजड असेल तर त्यास धुतांना लाकडाने बडवितात. पण या बडविण्यापासून तादृश फायदा नाही. त्यापेक्षा असा कपडा पायाखाली खूब तुडवावा. वरचेवर पाण्यात घालून वरचेवर तुडविल्याने त्यांतला मळ पाण्यात उत. रतो. पोलकी, बनियानी, अंगडी टोपडी वगैरे उन्हाळ्यांत व हिवाळ्यांत कोंबट पाण्यात बुचकळून दगडावर पसरावी आणि त्यांस थोडासा साबण लावून व पिळे करून ती एकावर एक दाबून ठेवावी. कांहींवेळाने ती धुतली झणजे स्वच्छ निघतात. शिवलेले कपडे दगडावर कधी मोठ्याने आपटूं नयेत. कापसाची किंवा तागाची फार मळकी किंवा ओशट वस्त्रे थोडा सजीखार, रिठे किंवा साबण विरघळलेल्या व कडकडीत तापलेल्या पाण्यात घालून कांही वेळ शिजत ठेवावी. भांडयावर झांकण ठेवावें. मधन मधून ती वस्त्रे एका काठीने वर खाली करावी. जो भाग अधिक डागलेला असेल तो वर करून हातांनी चोळून टाकावा. नंतर ती वस्त्रे बाहेर काढून थंड पाण्याने धुवावी. जरूर पडल्यास ही क्रिया दोन तीन वेळां करावी. रेशमी व लोकरीची रंगीत वस्त्रे घरी धुण्याच्या भानगडीत पडूं नये. वाफेने धुण्याचा कारखाना जवळपास असल्यास त्या कडे द्यावी. रंगीत नसतील अशी वस्त्रे घरी धुण्यास हरकत नाही. मात्र ती चुलीवर कढवू नयेत; आणि दगडावर आपटूं नयेत. अशी वस्त्रे घंगाळांत रिठे, साबू किंवा सोडा विरघळून किंवा लिंबाचा रस पिळून त्यांत