पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/50

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. ४५ साबण नाही. हा साबण आदले दिवशी रात्री ओल्या कपड्यांना थोडासा लावून त्या कपड्यांची गुंडाळी करून ठेवावी, व दुसरे दिवशी ते कपडे धुवावे ह्मणजे थोड्या श्रमांत ते फार स्वच्छ निघतात. (१०) घरगुती धुण्यांत वस्त्रे भिजविणे, घासणे, पिळा करणे, खळबळणे, आपटणे, पुनः खळबळणे, पिळणे, झटकणे आणि घडी घालणे इतक्या गोष्टी येतात. वस्त्राच्या मळकटपणाप्रमाणे यांतल्या कित्येक गोष्टी पुनः पुनः कराव्या लागतात. या प्रत्येक गोष्टीसंबंधाने पुष्कळ सांगता येईल. पण विस्तार होईल ह्मणून व ही कामें संवयीने आपोआप चांगली करतां येतात ह्मणून त्यांसंबंधानें ज्यास्त लिहीत नाही. येथे येवढे मात्र सांगून ठेवणे अवश्य दिसते की वस्त्र दगडावर आपटल्याने ते स्वच्छ निघण्यास विशेषशी मदत होते ही समजूत चुकीची आहे. ओला कपडा पाण्यांत पुष्कळवेळां चांगला खळबळल्याने व पाणी वरचेवर बदलल्याने आधिक स्वच्छ निघतो. ___(११) कांही वस्त्रे काही विशेष प्रकारानेच धुवावी लागतात. कोरे वस्त्र जाड व मळिण असेल तर प्रथम परटाकडून धुऊन आणावें, लुगडी मात्र परटाकडेस देण्याची चाल नाहीं. लुगडी परटाने धुत-- ल्यास त्या लुगडयांचा रंग व काठ बिघडून वाईट दिसू लागतात. कोरे वस्त्र घरी धुवावयाचे तर ते थंड पाण्यात चिंब भिजवून कांहीं वेळ तसेंच ठेवावें, ह्मणजे त्यास खेळ असली तर ती सुटून मोकळी १ कापडाचे पोत सारखें भरलेलें, टणक व तुकतुकीत दिसावें ह्मणून वस्त्र विणून तयार झाल्यावर त्याला खळ ह्मणजे शिजविलेले पातळ पीठ लावण्याची चाल आहे. ही खळ कित्येक धान्यांच्या पिठाची, कंदमुळांच्या सत्त्वाची. बियांची किंवा प्राण्याच्या अंड्यांतल्या बलकाची केलेली असते. परीट लोक कपडे धुतल्यावर व रंगारी लोक कपडे रंगविल्यावर ते ताठ राहावे व तो दार दिसावे ह्मणून त्यांस खळ लावतात. तिला कलफ ह्मणतात.