पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/49

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४४ घरांतली कामें. धुण्याचा दगड-धुण्याचा दगड हा थोडा उंच पाहिजे. तसा तो नसला तर वस्त्र आपटण्याचे काम पायावरच करावे लागते. त्याने धुण्याचे काम व्हावे तसे होत नाही व अंगावर शिंतोडेही उडतात. हा दगड अगदी गुळगुळीत उपयोगी नाही. थोडासा खरखरीत असलेला चांगला. भांडी-तांब्याची किंवा पितळेची घंगाळे खाली बूड बसविलेली असावी. रुंद तोंडाच्या पातेल्याला हरकत नाही, पण त्याला खाली बूड नसल्यामुळे ती लवकर झिजतात. बादल्यांच्या कड्यांचे जागी वस्त्र अडकून फाटण्याची फार भीति असते. बादल्या घेतांना याबद्दल फार सावधगिरी ठेविली पाहिजे. धुतांना जवळ दोन भांडी असावी. एक धुण्याला व दुसरें खळबळण्याला. वस्त्र निर्मळ करणारी द्रव्ये-ह्मणजे रिठे, साबण, वॉशिंगसोडा वगैरे. रिठे ही एका झाडाची लहान बोराएवढी फळे असतात. यांच्यावरची साल पाण्यांत चोळली झणजे त्यापासून फेस निघतो. हा फेस वस्त्रांना लावावा. साबण अंगाला लावण्याचा वेगळा व धण्याचा वेगळा असतो. धुण्याचा साबण सजीखार, चुना, खडू, किंवा खारी माती आणि कसले तरी तेल यांचा करतात. खोबरेल तेलाचा साबण सर्वांत चांगला. विलायती साबणांत तेलाच्या ऐवजी बहुधा चरबी घातलेली असते. चरबीच्या अंगी फेस जास्त आण. ण्याचा धर्म असतो. उत्तम साबणाचे लक्षण हे आहे की तो आर्द्र व तुकतुकीत असावा. रुक्ष व सुकट साबू वाईट. साबू हातावर चोळ. ल्यावर फेस सहज व पुष्कळ निघाला पाहिजे. बारसोप नांवाचा कपडे धुण्याचा साबू मिळतो. हा साबण इकडेही होतो. विलायती साबणांत कपडे धुण्यास सनलाइट सोप सारखा चांगला दुसरा