पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. ४३ जे वस्त्र पाण्याने धुण्यासारखे असते त्यावरचे डाग काढणे बरेंच सोपे जाते. तरी त्यांत वस्त्राचे सूतपोत पाहून व डागाच्या द्रव्याचे गुणधर्म ओळखून योग्य उपायाची योजना केली पाहिजे. सामान्यतः डाग किंवा मळ काढणाऱ्या द्रव्यांत तेल, क्षार, व आम्ल ही तीन बहुधा असतात.जसें--हरभऱ्याचे किंवा तुरीच्या डाळीचे पीठ, सजीखार, वॉशिंगसोडा, पोट्याश, खारी भाती, मीठ, टपेंटाईन वगैरे. (९) वस्त्रे धुण्यास साधारणपणे पुढील सामान लागते. यापैकी ज्या धुण्यास ज्याची अवश्यकता असेल ते त्या वेळी घ्यावें: पाणी--हें गोड व निर्मळ असावें. साधारण खारे किंवा मचूळ पाणीही चालते. ज्यांत लोह, क्षार, चुना किंवा खडूचा अंश पुष्कळ असेल ते किंवा गढूळ झालेले पाणी वस्त्र धुण्यास चांगले नाही. पाण्यांत दोन गुण असतात. १ वस्त्र निर्मळ करण्याचा व २ त्याला आब ह्मणजे तजेला देण्याचा. काही ठिकाणच्या पाण्यांत हे दोन गुण विशेष प्रमाणाने असतात. सुती कपडे धुण्याला दक्षिणेत कृष्णानदीचे व पूर्वेस महानदीचे पाणी उत्तम समजतात. लोकर धुण्याला काश्मीरांतील श्रीनगराखाली झेलम नदीचे पाणी सर्वोत्कृष्ट समजले जाते. पांढरे सुती वस्त्र ऊन पाण्यांत रोज धुतल्याने त्याला लवकरच मोतिया रंग चढतो. कित्येकांना अशा मोतिया रंगाच्या धोतरांची विशेष आवड असते. ऊन पाण्याने भिजून कांहीं वेळ धोतर तसेंच त्या पाण्यांत पडून राहणे मोतिया रंग चढण्यास पुरे होते. ___१ टपैंटाइन हे पाइन जातीच्या वृक्षापासून वाफेच्या साह्याने काढतात. हे तेल अमेरिका आणि रशिया या देशांत विपुल होत असून तेथून साऱ्या जगाला त्याचा पुरवठा होतो. दोन्ही देशांचे तेलांचे गुणधर्म सारखेच आहेत. रशियन तेलाला वास मात्र अधिक असतो, व तो वस्त्राला तेल लाविल्यावर बरेच दिवस जात नाही. यासाठी अमेरिकेतले टपैंटाईन वापरणे चांगले.