पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/47

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४२ घरांतली कामें. हे एक महत्त्वाचे व हिताचे कर्तव्य आहे अशी समजूत मनांत पक्की बाणल्यावर शक्य असेल तेवढे तरी करा असे निराळे सांगावे लागत नाही. (७) कोणतेही वस्त्र धुण्यास घेण्यापूर्वी ते कोठे फाटले तुटले असेल तर ते अगोदर शिवून नीट करून घ्यावें. नाही तर धुतांना तें ज्यास्तच फाटत जावयाचे. वस्त्रावर तेलाचे, शाईचे किंवा दुसरे कशाचे डाग पडले असले तर ते डाग अगोदर साबणाने वगैरे काढून मग तें वस्त्र धुवावें. नाही तर त्याच्या संसर्गाने दुसऱ्या वस्त्रांनाही डाग पडण्याचा संभव असतो. (८) वस्त्रावरचे डाग काढण्याचे काम सोपे नाही. त्याला रासायनिक द्रव्यांची चांगली माहिती लागते. निरनिराळ्या पदार्थांचे डाग निरनिराळ्या रासायनिक द्रव्यांनी निघतात. डाग काढण्याची साधारण पद्धत अशी आहे की वस्त्र रंगीत व पाण्याच्या स्पर्शाने बिघडण्यासारखे असेल तर डाग पडलेल्या भागाखाली एखादा कापडाचा तकडा धरून डागावर बेंझोलचा बोळा तो भाग चांगला भिजेल इतका फिरवावा. सायनाइड ऑफ पोट्याशचे पाणी करून तें ब्रशाने जरीच्या कपड्यावर फिरविल्यास जर साफ आणि नव्यासारखा चकचकीत दिसू लागतो. सिल्व्हर नायट्रेट सारखे न निघणारे डागही या द्रव्याने निघतात. पण हे द्रव्य घरी ठेवणे सुरक्षितपणाचे नाही. एखादे वेळी मुलाने चुकून ते औषध ह्मणून घेतल्यास ते खात्रीने दगावेल. ह्मणून हे औषध घरांत आणून ठेवू नये. १ बेंझोल किंवा बेंझीन हे एक खानिज द्रव्य आहे. पाणी न लावतां सुकें धुण्याचे कामी याचा फारच चांगला उपयोग होतो.