पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/46

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. नांवाखाली हा खरोखर अधर्म घडत आहे असें ह्मणावे लागते. आपल्या हिंदुधर्मांतही सोंवळ्याचा अतिरेक करणारांच्या हातून गैरसमजुतीने अशा प्रकारच्या कित्येक विचित्र गोष्टी घडतात. काहीं फार सोवळ्या बायका जळाऊ लांकडे आणि बाजारचे मीठ सुद्धा धुऊन घेतात असें ह्मणतात ! याच्या उलट खाणावळींतला प्रकार पहा! स्वच्छ धुतलेलें धोतर नेसून जेवावयास बसलेला मनुष्य भ्रष्ट समजतात, आणि महिनामहिना ज्याला पाण्याचा स्पर्श झालेला नाही व ज्यावर घामाची मेणचट पुटे चढून घाण येत असते असा मुकटा नेसून जेवण्यास बसलेले मोठे धर्मनिष्ठ गणिले जातात ! अशा घाणेरड्या लोकांची वेगळी पंगत करून स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून बसणाऱ्या लोकांना त्यांचा अमंगल स्पर्श न होऊ देण्याची जी खबरदारी ठेवण्यांत येते ती एका दृष्टीने फार स्तुत्य आहे यात शंका नाही. . (५) कित्येकांच्या मनालाच मलिनपणा व गलिच्छपणा यांचे कांही वाटत नाही. स्वच्छतेने कां राहिले पाहिजे, याची त्यांना कल्पनाच नसते. अंगावर कपडा पाहिजे, मग तो कसा का असेना? ही व्यांची समजूत. लहानपणी स्वच्छतेचे महत्व त्यांच्या मनावर कोणी बिंबविले नसते व स्वच्छतेने राहण्याच्या संवयी त्यांना लागलेल्या नसतात, त्याचा हा परिणाम असतो. ह्मणून ते धुण्याचे काम करवेल तितकें कमी करतात. (६) कित्येकांना स्वच्छता पाहिजे असते, पण धुण्याला लागणारी साधनें ह्मणजे विपुल व स्वच्छ पाणी, धुण्यासाठी प्रशस्त मोरी व दगडी चौरंग, किंवा नदीचा घाट पुरेसा वेळ, आणि अंगांत शक्ति यांची अनुकूलता नसते. अशांनी जी अनुकूलता असेल तिच्यांतच शक्य तेवढी स्वच्छता ठेवण्यास झटले पाहिजे. स्वच्छता ठेवणे