पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/45

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४० घरांतली कामें. असे समजून ते धुवावे लागतात. अशा ठिकाणी स्पर्शास्पर्शाचा विशेषसा विधिनिषेध मानूं नये हे इष्ट आहे. आपल्या जुन्या समजुती प्रमाणे सुद्धां जितकी लागालाग ज्यास्त होईल, तितका विटाळ कमी समजतात. बाजारांत तर हा दोष मुळींच मानीत नाहीत. फार झाले तर असा स्पर्शास्पर्शदोष घालविण्यासाठी विटाळलेल्या कपड्यावर गोमूत्र शिंपडण्याचा प्रकार सांगितला आहे. तो जुन्या चालींच्या लोकांच्या समजुतीखातर पाहिजे तर करावा. परटाने धुऊन आणून दिलेल्या कपड्यांवर पाण्याचे चार थेंब शिंपडून मग त्यांना हात लावावयाचा अशी जुनी चाल होती, पण आतां ही चाल बहुतेक मोडल्यासारखीच आहे. (३) सोवळे वस्त्र ओवळे झाले असतां तें धुतल्याशिवाय पुनः सोवळ्याच्या कामी येत नाही. सोवळ्याचे ओवळे होण्याचे मुख्य प्रकार ह्मणजे कटिमुक्त होणे ( नेसलेले वस्त्र सोडणे ), पर्युषित (वस्त्र नेसल्यापासून त्यावरच तीन अहोरात्रे उलटून जाणे, ) ओवळ्याचा संसर्ग होणे, नेसलेल्या सुती वस्त्रावर जेवण होणे, शौचास जाऊन येणे, उष्टयाचा संसर्ग घडणे वगैरे. यांतले पष्कळसे प्रकार व्यवस्थित राहणीने टाळतां येण्यासारखे आहेत. तेव्हां तसे राहत धुण्याचे काम सहज कमी करता येईल. (४) घरी धुण्याचे काम जसे कित्येक लोक निरर्थक वाढवितात तसे कित्येक लोक तें निरर्थक कमीही करतात. तसे करणे ही चांगले नाही. जैनधर्मी श्रावक लोक मळीण कपड्यांत बसणाऱ्या जीवांचा नाश होऊ नये ह्मणून वस्त्रे धुण्याचा संकोच करतात. फार काय, पण त्यांच्यांतले जे अत्यंत धर्मनिष्ठ मणविणारे असतात ते याच कारणासाठी वर्षानुवर्षे स्नान सुद्धा करीत नाहीत ! धर्माच्या