पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/44

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें घरी धुतां येण्यासारखी वस्त्रे-रोजची नेसण्यापांघरण्याची आणि अंगांत घालण्याची बहुतेक सर्व वस्त्रे घरीं धुतां येण्यासारखी आहेत. उदा० --पुरुषांची धोतरें, मुकटे, पंचे, उपरणी, सदरे, पायमोजे, हातरुमाल इ.; बायकांची लुगडी, पातळे, चोळ्या, छिटे, चौघडया, पोलकी वगैरे; मुलांची आंगडी टोपडी, बाळंती, परकर, लंगोट्या इ०; यांशिवाय अंथरुणांतल्या चादरी, उशीच्या खोळी, किरकोळ फडकी वगैरे वस्त्रे पुष्कळ सांगता येतील. या ३ घरी वस्त्रे धुण्याच्या संबंधांत पुढील गोष्टी लक्षात ठेवण्यासारख्या आहेत--(१) रोजचे घरीं धुण्याचे काम बेताचे व आटोपशीर असले पाहिजे. तें अवश्यकतेपेक्षा अधिक वाढविणे योग्य नाही. रोज नेसण्याची किंवा अंगांत घातल्याने घामाने खराब होणारी - वस्त्रे रोजचे रोज धुतली पाहिजेत. पण कधीकाळी लागणारी वस्त्रे कधीकाळीच धुवावी. ती रोज धुण्याचे कारण नाही. धुणे पुष्कळ वाढविल्याने एक तर त्यांत वेळ फार मोडेल आणि धुण्याचें-मळ काढण्याचे काम व्हावे तसे चांगले होणार नाही. कित्येकांना धुण्याचा सोस फार असतो. यामुळे व कित्येक सोवळ्या-ओवळ्याचे स्तोम फार वाढवितात यामुळे धुणे वाढते. दोन्ही गोष्टी मर्यादेत ठेवणे फार जरूर आहे. (२) स्पर्शास्पर्शाच्या विचारासंबंधानेही थोडेसें विचारपूर्वक वर्तन ठेविल्यावांचून चालत नाही. विटाळशीचा विटाळ, सुतक्याचा विटाळ, अस्पृश्य वस्तूचा स्पर्श वगैरे होण्याचे प्रसंग जितके कमी आणतां येतील तितके चांगले. पण लहान मुलांना कळत नसल्याने ती विटाळशीच्या कपड्याला शिवतात, किंवा तिच्या तांब्याला हात लावतात, आणि मग त्या मुलाच्या अंगांतले सगळे कपडे विटाळले