पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/43

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३८ घरांतली कामें. www रंगाऱ्यांचा वेगळा वर्ग नाही. आमच्या इकडे ही या पद्धतीवर काही शहरांतून लहान प्रमाणावर असे कारखाने निघत आहेत ही संतोषाची गोष्ट आहे. कित्येक श्रीमान् लोक परटास चाकरीस ठेवून आपले सगळेच कपडे त्याच्याकडून धुववितात; पण सोवळयाओवळयाचा आणि स्पर्शास्पर्शाचा निबंध मानणारे जुन्या चालीचे लोक ही रीत पसंत करीत नाहीत. सामान्य स्थितीतल्या माणसांना तर सगळे कपडे परटाकडे धुण्यास देऊन चालत नाही. पुष्कळसे कपडे घरचे घरीच धुऊन काही निवडक कपडेच परटाकडे देणे खर्चाच्या दृष्टीने त्यांना सोयीचे असते. शिवाय मध्यम किंवा गरीब स्थितींतल्या माणसांजवळ कपडे बेताचेच असल्यामुळे ते ज्यास्त दिवस परटाकडे राहूं देणे ही त्यांना फार गैरसोयीचे होते. या शिवाय आणखी एक मोठी अडचण त्यांच्या मार्गात असते. ती ही की आपले धोबी कपडे धुतांना ते भट्टीत घालतात व जोराने आपटतात. त्यामुळे अग्नीच्या संसर्गाने जळून व आपटण्याने त्या कपड्यांचा अर्धा जीव होतो. कपडे लवकर जीर्ण होतात, व शिवलेल्या जागी उसवतात. अशा अनेक कारणांमुळे मध्यम व गरीब स्थितीतल्या लोकांनी होता होईल तो कपडे घरीच धुवावे व जरूरीपुरते कपडे परटाकडे धुण्यास द्यावे हे सर्व दृष्टींनी चांगले आहे.. १ जुन्या आचाराचा निबंध असा आहे की परटाने धुतलेले वस्त्रावर स्नानसंध्या, देवपूजा वगैरे करूं नये. वस्त्राची पवित्रता राहावी हा या निबंधाचा मूळ उद्देश आहे. परटाकडे अनेक घरचे अनेक प्रकारे दूषित झालेले कपडे धुण्यास येतात. तेव्हां त्यांच्या संसर्गानें अपवित्र झालेली वस्त्रे वापरणे अपवित्रच नव्हे तर रोगोत्पादकही असतें ही गोष्ट कोणीही नाकबूल करणार नाही.