पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/42

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. _शाली, लोकरीचे कोट, रेशमी रुमाल, पटके, व रेशमी कोट वगैरे वस्त्रे बरेच दिवस वापरल्याने मळली असतां व त्यांचा रंग बिघडला असतां ती धुऊन पुनः रंगविण्याची तजवीज मुंबई, पुण्यासारख्या मोठ्या शहरांतून हल्लीही करता येते. तेव्हां शक्य असेल त्यांनी या तजविजीचा फायदा करून घ्यावा. परटाला देण्याची वस्त्रे-- जाड, मोठाली, अवजड, घरीं धुतां न येण्यासारखी वस्त्रे (उदा०--जाजम, सतरंज्या, सुताडे) ही परटाकडेसच धुण्यास दिली पाहिजेत. आपले परीट पिढीजाद धुण्याचाच धंदा करीत असल्यामुळे थोड्या खर्चात कपडे चांगले स्वच्छ धुतां येतील अशा देशी मसाल्याची त्यांना माहिती असते. त्यामुळे अशी वस्त्रे घरी धुण्यास आपणास जे श्रम पडावयाचे किंवा खर्च लागावयाचा, त्यापेक्षां अल्प श्रमांत व खर्चात त्यांचेकडून ती आपणांस धुऊन मिळू शकतात. तरी आमच्या परटांना युरोपियन परटांपासून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. पाश्चात्य लोकांनी प्रत्येक गोष्टीचे शास्त्र केले आहे, तसे कपडे धुण्याच्या कलेलाही त्यांनी शास्त्राच्या योग्यतेला चढविले आहे. या शास्त्रावर पुस्तकें आहेत, व शेकडों प्रकारचे साबण, क्षार, व इतर शुद्धिकारक द्रव्ये शोधून त्यांचा उपयोग केव्हां व कसा करावा तें शिकविण्याचे आणि धुण्याच्या यंत्रांची माहिती करून देण्याचे काम तिकडे त्या धंद्याच्या शाळांतून व खाजगी वर्गातून जोराने चालले आहे. तिकडे वस्त्रे धुण्याचे वाफेच्या साह्याने चाललेले शेकडो कारखाने शहरोशहरी आहेत. यांना लाँड्री ह्मणतात. या कारखान्यांत कपडे भिजवून व कोरडे दोन्ही पद्धतींनी धुण्याचे व रंगविण्याचे काम करतात. धुणे व रंगविणे ही एकाच धंद्याची दोन अंगें ते मानतात. यामुळे तिकडे