पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/40

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. ३५ केरकचरा राहूं देऊं नये. घासणी धुऊन राखेच्या कुंड्यांत ठेवावी. गवत, पाने वगैरे दुसऱ्या वेळी पुनः घासण्याच्या उपयोगी पडण्यासारखी नसतील ती उचलून केराच्या हौदीत टाकावी. बाकीचे जिन्नस जागचे जागी ठेवावे. भांडी विसळून उरलेले पाणी फेकून द्यावे. बालट्या व भांडी स्वच्छ धुऊन जागचे जागी ठेवावी. रुमाल, फडकी वगैरे धुऊन वाळत घालावी. ____२५ भांडी घासण्याचे काम तळ्यांत, विहिरीत, घाटावर, किंवा डबक्यांत करूं नये. ते स्वैपाकघरांतही करूं नये. बाहेरच्या मोरीवर करावें. २६ भांडी वासण्याचे काम संपल्यावर हातपाय स्वच्छ धुवावे. नखांत मळ सांचला असेल तर तो काढावा, अंगावर किंवा वस्त्रावर राख वगैरे उडाली असेल तर ती सगळी झाडून स्वच्छ व्हावें. अंगाचे सगळे भाग ओल्या फडक्याने पुसावे. कपाळाचा 'घाम वगैरे पुसावा. भांडी घासण्याने हात खरखरीत झाले असतील त्यास थोडे कढविलेलें मेण, किंवा व्हॅसेलीन, अगर तूप, दुधावरची साय वगैरे एखादा ओशट पदार्थ थोडासा चोळावा. सूचना-घरांतली केरपोतेरें, भांडी घासणे वगैरे कामे करतांना एखादे जुनेरें वस्त्र नेसावें. ते अशा कामाकरितां निराळेंच राखून ठेवावे. याच्या योगाने चांगले नेसते वस्त्र खराब होत नाही. साहेब लोकांच्या घरांत कामें करतांना बायका झग्यावरून कमरे पासून खाली पायापावेतों एक फडकें बांधीत असतात. त्याला एप्रन ह्मणतात. ही फडकें बांधण्याची रीत फार चांगली आहे.