पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/39

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३४ घरांतली का. ___जंगलेले, कळकलेले किंवा काळे ठिक्कर पडलेले भांडे असेल त्यास ताक, चिंच, लिंबू किंवा दुसरा काही आंबट पदार्थ लावावा, किंवा मीठ, सोरा किंवा दुसरा एखादा क्षार चोळावा, किंवा ते पदार्थ पाण्यांत विरघळून त्या पाण्यांत ते भांडे काही तास बुडवून ठेवावें, आणि त्याचा काळेपणा किंवा जंग सुटला ह्मणजे घासावें; किंवा निळीचें अथवा एरंडीचे तेल चोपडून ठेवावे आणि काही वेळाने जाड कापडाचा तुकडा, चिंधी किंवा जुना कापूस त्याच तेलांत बुचकळून त्याने चोळून चोळून सावकाश घासावें. एकवेळ याप्रमाणे करून भांडे साफ झाले नाही, तर दोन किंवा तीन वेळां तसेंच पुनः पुनः करावें. भांडे फार जड व मोठे असले तर नुसत्या विटकरीची पूड किंवा जाड रेती यांनी घासावें ह्मणजे स्वच्छ निघेल.. .२२ लांकडी, दगडी, चिनी व कांचेची भांडी गार पाण्याने धुवावी. विशेष ओशट असली तर गरम पाण्याने धुवावी. जरूर असल्यास बेसनाचे पीठ किंवा राख चोळावी. आधणाचे पाणी कांचेच्या, चिनी मातीच्या, किंवा हस्तिदंती जिनसेवर ओतूं नये. त्याने ती तडकेल. चिनी किंवा काचेच्या भांड्यावरचा डाग किंवा कळकट धुरकट अशा रीतीने धुऊन निघाले नाही तर गुळाचे किंवा चुन्याचे पाणी किंवा लांकडाची राख चोळावी, ह्मणजे भांडे स्वच्छ निघेल. ___२३ देवाच्या मूर्ति--बाळकृष्ण, गणपति, देवी, गंगा, गाय इ. मूर्ति घरोघर असतात. त्यांस धुतांना राख किंवा माती लावू नये. लिंबू, चिंच, किंवा कवठाचे पाणी लावून साखरेने चोळावें किंवा बारीक वस्त्रगाळ रांगोळी किंवा कुंकू चोळून घासावें.. २४ भांडी घासणे झाल्यावर ती पुसून जेथील तेथे नेऊन ठेवावी. भांडी घासलेली जागा धुऊन साफ करावी. तेथें राखोडी किंवा