पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. किंवा अल्युमिनच्या भांड्यांना हे नियम लावतां यावयाचे नाहीत. अशी भांडी बेसन ( हरबऱ्याचे पीठ ), कोंडा, किंवा राख यांनी हलक्या हाताने साफ करावी. ती फार काळवटली असली तर लिंबू, चिंच,आंबट ताक किंवा दुसरा कांहीं आम्ल पदार्थ यांनी साफ करावी. - चांदीची लहानसान भांडी शामाय लेदर, प्लेट पॉवडर, किंवा प्लेट क्लीनिंग अल्कली ही द्रव्ये चोळल्याने स्वच्छ होऊन चकचकीत दिसू लागतात. अल्युमिनमची भांडी कांहीं दिवस वापरल्यावर त्यांच्या आंतल्या बाजूस भुऱ्या रंगाचा थर बसल्यासारखा दिसतो. हा थर खरवडून काढण्याचे कारण नाही. कारण, तो विकार करणारा नसतो. उलट त्यापासून भांड्यांचे संरक्षण होतें हा फायदाच आहे. अल्युमिनमच्या भांड्यांस तुरटीच्या बारीक भुकटीने चोळले असतां चकाकी येते. अल्युमिनमच्या भांड्यांत क्षारयुक्त ( मीठ घातलेले ) पदार्थ विषारी होतात अशी कित्येकांची समजूत आहे, ती खरी नाही. तथापि असे क्षारयुक्त पदार्थ त्या भांड्यांत बराच वेळ ठेविल्याने त्या भांड्यास भोंके पडतात, ह्मणून असे पदार्थ त्यांत ठेवू नयेत. लोखंडांची भांडी—प्रथम ठिकरीने चांगली रगडून घासावी. आणि नंतर विटकरीने किंवा वाळूनें घासल्यास ती चांगली स्वच्छ होतात. २० ओशट किंवा तेलकट भांडी प्रथम विस्तवांत घालून भाजून काढावी, किंवा शेण लावून कढत पाण्याने धुवावी आणि मग घासावीं. २१ कथलाचे किंवा कल्हईचे भांडे विस्तवांत घालू नये, किंवा फार वेळ विस्तवाच्या आश्रयाने ठेवू नये. नाही तर कथील वितळन भांडे कामांतून जाईल.