पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. १८ भांडयांची जळकी बुडें-कोणत्याही भांडयाच्या बुडाला काळे जमू देऊ नये. तसले भांडे पाण्यात बुचकळण्याच्या किंवा एखादा पदार्थ शिजत असतां त्यावर झाकण ठेवण्याच्या उपयोगी अगदी राहत नाही. बुडाला काळें जमू दिल्याने भांडे बुडाशी मजबूत होतें ही समजूत अगदी चुकीची आहे. भांडयाची झीज कमी करण्याचा खरा उपाय झणजे ते चुलीवर ठेवण्यापूर्वी त्याच्या बुडाला व गळ्यापर्यंत वर राख किंवा माती ओली करून तिचा थर द्यावा. त्याने भांड्याचे जळण्यापासून रक्षण होते आणि तें घासण्याचे काम ही सोपे होते. चलीवर ठेवलेले भांडे बुडाशी काळे होण्याचे कारण चुलींत आपण लाकडे जाळतों हे आहे. लाकडाच्या ऐवजी कोळसे जाळल्यास भांडी फारशी जळत नाहीत व ती घासायास फारशी. मेहनत ही लागत नाही. लाकडापेक्षां कोळसे थोडेसे महाग पडतात खरे. पण भांड्याची जळ व घासण्याचे श्रम यांचा विचार केला तर एकंदरीत कोळसे वापरणे चांगले असे वाटते. कोळशापासून दुसरा फायदा हा आहे की स्वैपाकघरांत धूर होण्याची व त्यामुळे डोळे खराब होण्याची भीती नसते. शिवाय लाकडांपेक्षां कोळसे लवकर पेटवितां येतात. कोळसा वापरणे झाल्यास खालीं जाळीचा पत्रा बसविलेली शेगडी सारखी चूल वापरावी; मणजे या जाळींतन खाली राख पडून जाळीवाटे पेटलेल्या निखाऱ्यांस सारखी हवा मिळत राहील, व लांकडांना फू फू करीत फुकत रहावे लागते, तोही त्रास वाचेल. १९ विशिष्ट धातूंची भांडी-वर सांगितलेले नियम तांब्या-. पितळेच्या भांड्यांविषयींचे आहेत. चांदीच्या, जर्मन सिल्व्हरच्या,