पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/36

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें ११ कांहीं लह नसान बारीकसारीक धातूच्या जिनसा मेटल पॉलिश नांवाची पूड किंवा चाक ( खडू ) यांनी लवकर स्वच्छ व चकचकीत होतात. ही पूड फार थोडी लावावी, व चिंधीने खूप घासावें. १२ भांडी घासणे झाल्यावर घासलेली भांडी पाण्याने चांगली विसळून व फडक्याने पुसून पाटावर ठेवावी. १३ भांडी घासण्यासाठी व विसळण्यासाठी खारे पाणी घेतले असेल तर ती गोड्या पाण्याने चांगली धुऊन व पुसून ठेवावी. नाही तर त्यांना काळे पिवळे डाग पडतात. १४ भांडी घासणे व विसळणे या दोन कामांसाठी दोन निरनिराळी माणसें असली तर ही दोन्ही कामे लवकर व चांगली होतात. १५ भांडी घासतांना ओठ चावू नयेत,तोंड वेडेवाकडे करूं नये, व राखेचे, मातीचे किंवा पाण्याचे शिंतोडे अंगावर किंवा वस्त्रावर उडवून घेऊ नये. १६ खरकटया भांड्यांसंबंधाने विशेष नियम-खरकट्या भांड्यांस अन्न चिकटले असेल तें आधी एका भांडयांत काढून घ्यावें व तें पशुपक्ष्यांना चारावें. एक शीत देखील मोरीत जाऊं देऊं नये. कारण, अन्न मोरीत गेल्यास तेथें तें कुजते, आणि मग त्यामुळे आळ्या व किडे होऊन घरांतले चांगले अन्नपाणी आणि हवा ही ही दूषित होतात. याशिवाय खात्रयाचे अन्न अशा रीतीने मोरीत जाऊं देण्यापेक्षां तें पशुपक्ष्यांच्या तोंडांत पडले तर हातून थोडा फार परोपकार घडेल. ते अधिक चांगले नाही काय ? १७ भांडयांस चिकटलेले खरकटें उलथ्याच्या किंवा पळीच्या दांडयाने खरडून काढावें, बोटांच्या नखांनी काढू नये.