पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

३० घरांतली कामें. ३ अगोदर अगदी लहान, मग त्याहून मोठी आणि नंतर सर्वांत मोठी अशा क्रमाने भांडी घासावी. एखाद्या भांड्याची विशेष जरूर असेल तर ते अगोदर घासून द्यावे. ४ घासावयाचे भांडे अगोदर पाण्यात बुडवून अगर ओलें करून मग घासणीने घासावें. नुसत्या हाताने भांडे लवकर आणि पाहिजे तसे स्वच्छ निघत नाही. शिवाय हाताने घासल्यास हात काळे व खरखरीत होऊन थंडीचे दिवसांत ते फुटतात, नखांतून मळ जमतो, आणि तो निघतां निघत नाही. ५ नुसत्या हातानेच भांडे घासणे झाले तर बोटापेक्षा तळहातावर ज्यास्त जोर द्यावा. सगळाच पंजा लावण्याची अवश्यकता असेल तेव्हां तसे करावें. ६ भांडे घासतांना खाली भुईवर किंवा दगडावर आपटूं देऊ नये. ७ ज्या भांड्याचे तोंड अरुंद असेल, हात आंत जाण्याजोगें नसेल, त्याचा आतील भाग घासणी चिमट्यांत किंवा सांडशीत धरून तिनें रगडावा. ८ कित्येक भांड्यांचे काठ तीक्ष्ण धारचे किंवा तुटलेले असतात. अशी भांडी जपून घासली पाहिजेत. नाही तर काठावरून हात फिरवितांना बोटे कापावयाची. ९ होतां होईल तों फुटके भांडे वापरू नये. आपली जुनी समजत अशी आहे की फुटके भांडे वापरण हे दारिद्र्याचे लक्षण आहे. भांडे थोडेसें फुटतांच ते नीट करून आणावें. फारच फुटल्यास मोडीत देऊन नवें ध्यावें. १० भांड्यांना फार डाग पडले असले तर प्रथम ते युक्तीने काढून टाकावे. साधारण डाग अंमळ रगडून घासल्याने जातात.