पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/34

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. (४) ठिकऱ्या व काथ्या--दुसऱ्या एका डब्यांत विटेच्या ठिकऱ्या व नारळीचा काथ्या, ताडाचा किंवा शिंदीचा मोळ, काथ्याच्या दोरीचे तुकडे, केळीचे सोपटें, हिरवी पाने वगैरे ठेवलेली असावी. जी घासणी कमी झिजणारी आणि ज्यास्त दिवस टिकणारी असेल ती चांगली. (५) दाभण, नोकदार खिळा व काड्या--या वस्तु भांड्यांतल्या सांदीकोपऱ्यांतून सांचलेली राख, माती, मळ वगैरे काढण्यास लागतात. हे सगळे जिन्नस पांच चार खण असलेल्या एकाच लांकडी पाळ्यांत ठेवणे अधिक सोयीचे असते. या शिवाय भांडी धुण्यासाठी एक, भांडी विसळण्यासाठी एक, व जरूर असल्यास वरून गोडे पाणी घालण्यासाठी एक अशा तीन बादल्या ( बालट्या ) किंवा रुंद तोंडाची भांडी जवळ ठेवावी. या भांड्यांतून पाणी काढण्यासाठी एक तांब्या किंवा तपेली घ्यावी. भांडी घासतांना बसण्यासाठी एक आणि धुऊन पुसून स्वच्छ केलेली लहानसहान भांडी ठेवण्याला एक असे दोन पाट घ्यावे. धुतलेली भांडों पुसून स्वच्छ करण्यासाठी एखादा रुमाल किंवा जाड फडकेही जवळ ठेवावें. १ भांडी घासतांना पुढील गोष्टी ध्यानात ठेवाव्या-खरकटीं आणि बिनखरटी भांडी मिसळू नयेत. ती वेगवेगळी ठेवावी. प्रथम बिनखर कटी भांडी घासावीं, नंतर दुसरी घासावी. २ स्वयंपाकाच्या भांड्यांत प्रथम आंतबाहेर थोडथोडे पाणी घालून ठेवावें ह्मणजे आंतलें खरकटें व बाहेरचे काळे सुटण्यास मदत होऊन त्यामुळे भांडे घासण्यास सोपे जाते.