पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/33

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२८ घरांतली कामें. रीतीने उरकतां येते. ह्मणून हे सामान फावल्यावेळी अगोदर तयार करून ठेवावे हे चांगलें. निरनिराळ्या जातींची भांडी घासण्याला साधारणपणे पुढील सामान लागतें (१) राखेचा कुंडा--यांत राख भरून ठेवावी. ही राख गवरी (गोवरी) ची घेणे चांगले. तींतून खडे वेचून टाकलेले असावे. कारण खड्यांच्या योगाने भांडयांना चरे पडतात. तेलातुपाची भांडी घासण्याला राख फार चांगली. अशी भांडी राखेने घासण्यापूर्वी शेणाने एकदां घासली तर ओशटपणा फार लवकर जातो. ओशट भांडी घासण्यास गोवरीच्या राखेपेक्षाही लाकडाची राख-जी अगदी पांढरी शुभ्र दिसते व ओली असतां हाताला बुळबुळीत लागते ती-ज्यास्त चांगली. भांड्याचा ओशटपणा घालविण्यासाठी साबणाचाही उपयोग करतात. साबणाचे पाणी अशा भांड्यांत घालून चांगले खळबळल्यास सगळा ओशटपणा साफ निघतो. मागून साध्या पाण्याने भांडे दोनचार वेळां धुवावें ह्मणजे साबणाचा वास जातो. राखेने भांडे घासल्यावर ते विसळून कोरडया फडक्याने पुसलें झणजे भांड्यास चिकटून राहिलेला व नुसत्या विसळण्याने न जाणारा राखेचा पातळ थर फडक्यावर निघून येतो. भांडे फडक्याने न पुसलें व तसेंच वाळू दिले तर तो तसाच राहतो आणि भांडे कोरडे झाल्या. वर त्यावर बोट फिरविल्यास बोटास राख लागलेली स्पष्ट दिसते. (२) विटकरीचा कुंडा—विटेचे किंवा कौलाचे तुकडे कुटून त्यांची किंवा चुनखडीची भुकटी करून ठेवावी; किंवा रांगोळी, मुरुमाची माती, अगर बारीक रेती कुंड्यांत भरून ठेवावा. डाळीचा कोंडा, किंवा हरभऱ्याच्या डाळीचे पीठ ठेवावें.