पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/32

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. तो तसाच ठेवून दिला, आणि रात्री पुनः त्याच तव्यावर पोळ्या व पिठलें केलें, तर हे पदार्थ कदाचित् रुचीला वाईट लागणार नाहीत; तरी पण जळकी पिठी लागलेला, काळे पिवळे डाग पडलेला, व खालून जळालेला तवा सात आठ तास तसाच ठेवून पुनः तो स्वयंपाकांत घेणे पाहणाराला ओंगळपणाचे वाटेल यात शंका नाही. अशा अस्वच्छपणाच्या व ऐदीपणाच्या संवयीपासून तत्काळ जरी नव्हे, तरी कालांतराने दुष्परिणाम घडल्यावांचून सहसा राहावयाचे नाहींत. भांडी घासणे - भांडी घासावयाची ती स्वच्छतेसाठी, नुसत्या बाहेरच्या भपक्यासाठी नव्हेत, हे नेहमी लक्षात ठेविले पाहिजे.. अर्थात् भांडी बाहेरून तेवढी घासली आणि स्वच्छ केली, पण आंतून तशीच मळकट राहिली तर काय उपयोग ? ह्मणून वापरावयाची भांडी आंतून व बाहेरून सारखी स्वच्छ ठेविली पाहिजेत. भांडी घासण्याचे निरनिराळ्या प्रांतांतून निरनिराळे प्रकार आहेत. १ पुरभय्ये लोक भांड्याच्या बुडाला सुद्धा काळे राहू देत नाहीत. त्यांची भांडी आंतून व बाहेरून, वर आणि खाली, फारच स्वच्छ असतात. २ दुसरा प्रकार मारवाडी लोकांचा. हे लोक भांडे राखेनें कोरडे घासून घासून स्वच्छ करतात, त्याला पाणी लावीत नाहीत. या प्रकाराला सुखमंजन (सुकें घासणे) ह्मणतात. ३ तिसरा प्रकार आपला महाराष्ट्रीयांचा. आपल्यांत भांड्याच्या बाहेरील सफाईकडे जितकें लक्ष असते तितकें आंतील स्वच्छतेकडे नसते. आपल्या भांडयांची बुडे पहावी तर बहुधा काळी असतात. भांडे घासण्याला लागणारे सामान जर अगोदरच तयार करून ठेविले असेल, तर भांडे घासण्याचे काम थोडक्या वेळांत व्यवस्थित