पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/26

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. २१ mmmmmmmmmmmmmmmmmm २१ शेण कसे असावें तें पूर्वी सड्याच्या प्रकरणांत सांगितलेंच आहे. ते चांगले किंवा मुळीच मिळाले नाही तर हे सावडण्याचे काम कुंच्याने करून नंतर माती मिळवून किंवा नुसतेच पाणी फिरवावें. २२ चूल आणि सभोवतालची जागा दगडी किंवा पक्की चुन्याविटांची असेल, तर अशा स्थितीत शेणगोळा फिरविणे किंवा पोतेरें घालणे व्यर्थ आहे. कुंच्याने झाडून पाण्याने जागा धुऊन टाकली झणजे काम होईल. कोणी प्रथम शेण कालवून न फिरवितां एकदम पोतेरेंच फिरवितात. पण हा प्रकार काही अंशी गौण आहे. २३ शेणपाणी चांगले लाविल्यावर पोतेरें घालण्याची विशेष गरज राहत नाही. तरी ज्या स्वयंपाकाने देवाचा नैवेद्य वैश्वदेव व्हावयाचा तो करण्यास चूल आणि सगळे स्वयंपाकघर पोतेरें घालून शुद्ध केलेले असले पाहिजे. हे पूर्वीच्या स्वयंपाकाचे काम उरकतांच* करून ठेवलेले बरें. कारण आयत्यावेळी करण्यापासून त्याचा वाईट वास नाकातोंडांत शिरतो. ओल्यांत फिरणे किंवा बसणे आरोग्यालाही अपायकारक असते, व शिवाय भांडी व स्वयंपाकाचें साहित्य ताज्या पोतेयावर ठेवावे लागते. ते बरे नाही. चूल गरम असतांना मात्र ती सारवू नये. नाही तर चुलीचे तुकडे पडतात.. २४ मातीच्या चुलीला नुसते मातीचेंच पोतेरें फिरवावे. त्यांत शेण मिसळू नये. कारण, ते विस्तव पेटल्यावर जळून भांड्यांत उडते. चुलीच्या तळाशी पुढे खळगा पडला असेल, तर कोरड्या रात्रीचे पोतेरें घालण्याची जुनी चाल नाही. जुन्या चालीच्या घराण्यांतून तें सकाळीच घालतात. हा प्रचार दुपारी उशीराने जेवण्याचा परिपाठ असलेल्या काळांत बाधक नव्हता. आतां सकाळी ९।१० वाजतांच जेवण करणे भाग झाले आहे, तर त्याबरोबर पोतेऱ्याचा वेळही बदलणें प्राप्त आहे.