पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२ घरांतली कामें. मातीचे लहान खडे त्या खळग्यांत भरून लाकडाने ते चांगले कुटावे आणि थोडे पाणी शिंपडून लिंपण करावे. नंतर पूर्वी सड्याचे प्रकरणांत सांगितल्याप्रमाणे, सड्याच्या भांड्यांत माती व शेणः मिळवून सरबरीत मिश्रण करून पोतेऱ्याच्या फडक्याने प्रथम चुलीवरल्या भागावर व नंतर सर्व जागी पोतरें घालावे. भिंतीवर किंवा. भुईवर पोतेऱ्याचा थर जमेल तर कधीकधीं तो खरडून काढून टाकावा. पोतेऱ्याचे सारवण बेताचेच करावें, आणि केले असेल तेवढें संपवून टाकावे. शिलक राहिलेच तर त्यांतले शेणपाणी कुजू नये ह्मणून पुष्कळशी माती घालून ठेवावी. पोतेऱ्याचे फडकें चांगले स्वच्छ धुऊन वाळत घालावें, आणि पोतेरें घातलेल्या जागेवरून केरसुणी. फिरवावी. प्रकरण ६ वें. उष्टेखरकटें. खरकट्याचे दोन प्रकार आहेत. एक, उष्टें नाहीं असें खरकटें. व दुसरे उष्टं असलेले खरकटें. पैकी पहिल्याचा विचार 'चूलपोतेरें। या प्रकरणांत झाला. दुसऱ्याचा ह्मणजे उष्टे असलेल्या खरकट्याची. व्यवस्था काय करावयाची त्या संबंधाने या प्रकरणांत सांगावयाचे आहे. उष्टेखरकट करणे ह्मणजे जेवून गेलेल्या मंडळीची ताटवाटी. उचलून ती जागा स्वच्छ व शुद्ध करणे. २ स्वयंपाकघर व जेवणघर एकच असले तर चूलपोतेरे आणि उष्टेखरकटें ही कामें एकदमच करतां येतात. मात्र प्रथम चुलीपुढील काम व नंतर उष्टयांतले काम असा त्यांचा क्रम ठेवा. वयाचा असतो. ह्मणजे चुलीपुढे उपयोगांत आणिलेले शेण आणि