पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

घरांतली कामें. ती तशीच पाण्यात भिजत रोज पडूं दिली, तर लवकरच लाकूड कुजून ते जिन्नस निरुपयोगी होतात; आणि दुसरी गोष्ट त्यांत एखादी भेग असली आणि तींत खरकटें जाऊन बसलेलें नोकराचाकराने नीट काढले नाही, तर सोंवळ्या माणसाला ते जिन्नस स्वयंपाकांत घेतां येत नाहीत. या साठी ते स्वतःच धुऊन घेणे बरें. १८ सांडलेले अन्न ( पोळीचे किंवा भाकरीचे तुकडे, भाताची डिखळें वगैरे ) हाताने उचलून टाकतां येण्यासारखे असेल तर ते उचलून खरकट्या भांड्यांत टाकावे. पातळ पदार्थ सांडला लवंडला असेल किंवा भाज्यावरणाचे थेंब पडले असतील अशा जागा उलथण्याने खरवडून टाकाव्या. १९ चुलीवर * आणि सभोवतालच्या सगळ्या खरकट्या जागेवर पाण्याचा शिपका द्यावा, आणि नंतर त्यावरील खरकटें व केरकचरा सावडावा. हे काम नुसत्या हातानें, शेणगोळा फिरवून, किंवा कंच्याने झाडून करता येते. पण नुसत्या हाताने करण्यांत हात वाईट व खडबडीत होतात. ह्मणून दुसऱ्या दोन प्रकारांपैकी जो योग्य दिसेल त्याने करावें. २० शेणगोळे दोन करावे. एकाने खरकटें टिपीत पुढे न्यावें; दसऱ्यांतून थोडथोडे शेण पातळ करून हात फिरवावा. चूल शेणाने सारवं नये. तिच्यावरून पहिला गोळा फिरविला ह्मणजे झाले. सगळे सारवण झाले झणजे खरकटा गोळा आणि चांगल्यापैकी राहिलेले शेण फेंकून द्यावें.

  • चूल तापलेली असेपर्यंत तिच्यावर पाणी शिंपडूं नये; नाही तर तिचे पोपडे निघतात, व केव्हां तुकडाही पडतो.