पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ५ वें. १३ चुलीपुढील जिनसांची आवरासावर झाली झणजे पदर व ओचे चांगले घट्ट खोवून घ्यावे, आणि पाण्याचा तांब्या, बादली (बालटी), केरसुणी, शेणगोळा व पोतेऱ्याचे सामान तयार करून ठेवावें. १४ चुलीतली राख सगळी भरून घ्यावी. चुलीसमोरच्या भागांतून आणि आवेलाकडली राख उलथा किंवा पळी, यांनी काढावी. ही राख उष्ण असण्याचा किंवा तीत जळते कोळसे असण्याचा संभव असतो. ह्मणून ही राख हाताने काढू नये. वरून हाताला राख थंड लागली तरी पोटांत ती उष्ण असण्याचा संभव असतो. राख काढतांना तळाला फार खरडू नये. कारण, तसे केल्यास तळची जळकी मातीही निघून तेथे खाच पडते. १५ खरकटी भांडी सगळी एके जागी गोळा करावी. खालीं परात, तीवर झांकण्या ( वेळण्या ), ताटें, नंतर बोघुणी, वाडगे, वाट्या, एकांत एक घालून, त्यांवर तपेल्या, पळे, सांडसे, ओगराळे, चमचे वगैरे ठेवावे. आणि ती सगळी भांड्यांची रास मोरीवर नेऊन ठेवावी. भांडी पसरून ठेवू नयेत. घासण्याला विलंब असला तर भांड्यांत आंत व बाहेर बरेंच पाणी घालून ठेवावें, नाही तर भांडी वाळून जातील व घासण्याचे काम जड जाईल. भांडी बंदोबस्ताने ठेवावी. कारण, कुत्रे, मांजरें, कावळे वगैरे ती विसकटतात, आणि एखादें लहानसान भांडे उचलून सुद्धां नेतात. १६ लोखंडी चूल असली तर ती उचलून नेण्यासारखी असल्यास मोरीवर न्यावी व चांगली धुऊन पुसून ठेवावी. १७ लाटणे व पोळपाट ही बहुधा लाकडाची असतात. ती भांड्यांत न टाकतां लागलीच स्वतःधुऊन टाकावी हे बरें. एक तर