पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

उपसंहार. २३५ ramananmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm www द्यावी. रास्पबेरी, वाळविलेली द्राक्षे किंवा अंगुर, इ० चांगली उकड्रन त्यांच्या रसाचे पन्हें द्यावें. स्ट्रॉबेरी मुलांना कचित् द्याव्या. कारण त्या कितीएकांना सोसत नाहीत. (७) गोड फळांच्या द्वारे आणि अन्नाबरोबर साखर द्यावी. मध. मोरंबा, केव्हां चाकोलेट योग्य प्रमाणाने देण्यास हरकत नाही. पण पेढेबर्फी व पाकाचे पदार्थ अविचाराने देऊ नयेत. गूळ निर्मळ असला तर कधी कधी बेताबातानेच देणे योग्य होईल.मळीण गुळापासून प्रकृति बिघडते. शिवाय त्यापासून जंत होतात. वान.-कांदे, बीटच्या मुळया, मुळे, कांकडया, ताजा पाव, चहा, काफी, वगैरे पदार्थ मुलांना या वयांत देऊ नयेत. उपसंहार. प्रपंचांत माणसाला-विशेषतःस्त्रियांना करावी लागणारी जी घरांतली कामें आहेत, त्यांतल्या ठळक कामांपैकी काहींचे विवेचन आतापर्यंत करण्यांत आले आहे. राहिलेल्या कामांपैकी एक मुख्य काम ह्मणजे स्वयंपाक करणे हे आहे. या कामासंबंधाने या पुस्तकांत विवेचन यावयास पाहिजे होते. पण या विषयावर मराठी भाषेत बरीच पुस्तकें अगोदर झाली असल्यामुळे त्या विषयाची भर घालून पुस्तकाचा आकार वाढविणे इष्ट दिसले नाही. स्वयंपाकाशिवाय इतरही कित्येक महत्त्वाची कामें (उदाहरणार्थ घरच्या जमाखर्चाचें बजेट तयार करणे, रोजचे रोज होणारा खर्च लिहून ठेवणे, घरगुती औषधीउपचार, पत्रे लिहिणे, इ०) राहिलेली आहेत. त्याविषयींचे विवेचन 'संसारमालेतल्या पुढील एखाद्या भागांत करण्यांत येईल. प्रस्तुत पुस्तकांतल्या कित्येक गोष्टी दिसण्यांत अगदी क्षुद्र दिसतील; पण प्रपंचांतल्या अशा क्षुद्र गोष्टी सुद्धा व्यवस्थितपणे करण्याची संवय स्वतःला लावून घेणे आणि मुलींना लावणे अवश्य असल्यामुळे त्या अंमळशा विस्ताराने या पुस्तकांत सांगितल्या आहेत.