पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/239

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

travaanaa २३४ घरांतली कामें, wmrammarmerammarrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrrr बिरी, लोणची, मसालेदार पदार्थ, कच्च्या भाज्या, मिष्टान्ने किंवा पक्वान्ने, कवचीची फळे ( बदाम वगैरे ) आणि कच्ची फळे कधी देऊ नयेत. दोनवर्षांपुढे सातबर्षांपर्यंत. दोन वर्षांचे पुढे मुलाची पाचनशक्ति चांगली वाढते आणि त्याला क्षुधाही तीव्र लागते. त्याला बहुतेक अन्ने योग्य प्रमाणांत दिली असतां ह्या अवस्थेत पचतात. यावेळी पुढील गोष्टी मुख्यत्वे ध्यानात ठेवण्यासारख्या आहेत: (१) त्याचे अन्न कसदार असले पाहिजे; मंणजे त्यांत पोषक, बल देणारे, आणि शरीराची उष्णता कायम ठेवणारे पदार्थ भरपूर असावे. (२) अन्न नियमित वेळी बिनचूक द्यावें. मध्यंतरी दुसरे तिसरें कांहीं एक देऊ नये. (३) अन्न साधे असावें. मुद्दाम क्षुधा वाढविण्यासारखें अन्न देण्याची काही जरूरी नाही. (४) अन्नाचा बराच भाग चांगला चावून खाण्यासारखा असावा. कारण, मुलाला अन्नाचे योग्य चर्वण करून खाण्याची संवय झाली पाहिजे. (५) मुलाच्या आहारामध्ये दूध विशेष असावें. त्याच्या वयाप्रमाणे दिवसांतून २ किंवा ३ पाइंट दूध त्याला मिळाले पाहिजे. तें कांहीं तसेच साधे आणि कांहीं अन्नाबरोबर द्यावे. यावेळी कोको देणे हितावह आहे. (६) कांहीं थोडी ताजी फळे त्यास दररोज द्यावी. जसें नारिंग, द्राक्ष, केळे वगैरे. ही सकाळी कांहीं खाल्ल्यानंतर किंवा दुपारी