पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८ घरांतली कामें. .www अधिक डबे घ्यावे. एकाच प्रकारचे अन्न एका डब्यांत ठेवावें. पातळपदार्थ ( उ० वरण, कढी, आमटी वगैरे ) निराळे ठेवावे. वाडगे, वाट्या, तपेल्या, किंवा पातेली घेतली तर त्यांची झांकणे त्यांच्या बेताची असावी. ८ अन्नाची भांडी फडताळांत, शिंक्यावर किंवा जाळीदार पेटीत अथवा कपाटात ठेवावी. ती खाली भुईवर ठेवणे झाले तर त्यांवर आणखी एक जड मोठेसें पातेल्यासारखें झांकण घालावें. झांकण जड नसेल तर त्यावर एखादा दगड किंवा वरवंटा ठेवावा. ह्मणजे मांजराला तें उचलून अन्न खाता येणार नाही. ९ अन्न एखाद्या कोनाड्यांत किंवा खुल्या फरताळांत वगैरे ठेवणे झाले, तरी त्याच्या भांड्यास मजबूत झांकण पाहिजेच. नाहीं तर उंदरा-मांजराचा उपद्रव तेथेही झाल्यावांचून राहणार नाही. ताट किंवा पत्रावळ वाढून झांकून ठेवावयाची असली तर ती एखाद्या पाटावर ठेवून तिच्यावर दुसरा पाट किंवा भांडे झांकण घालावें.. १० अन्न ठेवणें तें स्वच्छ, सुक्या जागेत, हवा लागेल अशा बेताने ठेवावें. ११ चुली भोवतालची कामांत न अडलेली भांडी, साहित्याचे डबे, तिखटामिठाचे पंचपाळे, लोणच्याच्या व चटण्यांच्या दगड्या दधातपाच्या कथल्या इ. वस्तु जेथल्या तेथें उचलून ठेवाव्या.. १२ विझविलेल्या लांकडास कोठे विस्तव राहिला आहे की काय हें प्रथम नीट पहावें. विस्तव असल्यास तो पुरता विझवावा आणि मग लाकडे जळका भाग वर करून उभी करून ठेवावी. विझविलेले कोळसे एखाद्या कोठीत किंवा टिनच्या डब्यांत घालून ठेवावे. हे कोळसे विस्तव पेटविण्यास उपयोगी पडतील.