पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/238

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

namamrormannmamrammmmmmmm प्रकरण १८ वें. २३३ wwwwwwwwwwwwwwmmmmmmmmmmmm (२) साळीच्या लाह्यांचे पीठ, गव्हांच्या किंवा जवांच्या लाह्यांचा सातू , वेलदोडे, व बाळबेल, खडीसाखरेची पूड हे सगळे दुधांत कालवून द्यावे. हे अग्नि प्रदीप्त करतें. (३) लाह्यांचे आणि धापटीच्या फुलांचे पीठ खडीसाखरेच्या पिठीबरोबर दुधांत द्यावे. हे स्तंभन करते. इंग्रजी पद्धतीप्रमाणे नववेदहावे महिन्यांत दुधाबरोबर अन्नसत्त्वं देऊं लागावें. शेवटी शेवटी बारावे महिन्यांत आणि दुसरे वर्षी मुलाला पांच वेळ अन्न नावें. एकाद्याला ४ वेळां देणेही पुरे होते. मध्यंतरी थोडे थोडे पाणी पाजावें. परंतु भरविण्याचा वेळ चुकवू नये. किंवा मध्यंतरी कांहीं खावयास देऊ नये. दुसऱ्या वर्षी दोन पाइंट दूध दररोज मुलाला द्यावें. तें कांही तसेंच आणि कांहीं जेवणांत अन्नाबरोबर द्यावें. ह्या वर्षी चांगली शिजविलेली भाजीही त्यास द्यावी. : लाइम (लिंबाचा एक प्रकार), कागदी लिंबु, द्राक्षे, किंवा नारिंग ह्यांचा रस मुलाला रिकेट ( अस्थिक्षय ) किंवा स्कर्वी (रक्त बिघडणे) रोग, मुलास तापलेले दूध दिल्यामुळे किंवा दुसऱ्या अन्नदोषाचा वगैरे कारणाने होण्याचा संभव असतो,त्याच्या प्रतिबंधार्थ देण्याची चाल आहे. साबूदाणा, आरारूट, व टापिओका हलके समजून मुलाला देतात. पण वस्तुतः हे मुलांना कष्टानें पचतात. कारण त्यामध्ये स्टार्च असते. त्याशिवाय त्यांत पोषक तत्वेही काही नसतात, तेव्हा हे पदार्थ मुलांस न देणे चांगलें. बारामहिन्यांपुढे दुधाबरोबर बटाटे व दुसरी सत्त्वविशिष्ट भाजी देऊ लागावें. . अठरावे महिन्याचे सुमारापासून पांच खुराकांचे जागी ४ देणे पुरे होईल. मुलाला त्या वयांत मद्य, चहा, काफी, चटण्या कोशिं