पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

arramanand २३२ घरांतली कामें. ummmm mmmmmmmmm 10 जर बरोबर होत नसले तर निरोगी मुलासारखे त्याचें शौच gan असणार नाही, ही त्याची खूण समजावी. ९ जरासें निमित्त झाल्याबरोबर अन्नांत फेरबदल करूं नये, एकसारखी लक्षणे लागोपाठ होत गेली तर डाक्तराची सल्ला घ्यावी. १० सहासात महिन्यांचे मूल होईपर्यंत धान्यसत्वमिश्रित अन्न त्याला अगदीं देऊं नये. ११ मेलिन्स फूड, बेंजर्स फूड वगैरे पेटंट फूड द्यावयाचे झाले तर डॉक्तराच्या सल्ल्याप्रमाणे द्यावें. आपल्या चालीरीतीप्रमाणे मुलाचे उष्टावणास तुरीच्या वरणाच्या पाण्यापासून आरंभ होतो. पुढे साधा वरणभात, नंतर तुपासहित, नंतर वरणपोळी किंवा दूधपोळी आणि तिच्या जोडीला भाजल्या गव्हांचे किंवा तांदळांचे पीठ देतात. नुसते दूध उत्तरोत्तर कमी आणि अन्नाचा भाग अधिक देण्यात येतो. आरोळी (गाकर ) सारखा पदार्थ त्यास पचण्यास कठीण ह्मणून देत नाहीत. भाजीपाले, मीठ मसाल्यांचे पदार्थ किंवा फळे देत नाहीत; पण किसमिस वगैरे मेवा देण्याचा परिपाठ आहे. दुधाची खीर, बर्फी, जिलबी, लाडू, व तळणाचे पदार्थ यांचे पथ्य नसते. ह्या वयांत ह्यास दिवसा आणि सायकाळी चार किंवा पांच वेळां मिळून दूध पावशेरपर्यंत आणि इतकेंच अन्न देण्यात येते. वाग्भटांनी एक वर्षाच्या मुलाला देण्याच्या अन्नाचे कितीएक प्रकार सांगितले आहेत. त्यांतले कांहीं हे आहेत: (१): चारोळ्या, ज्येष्टीमध, साळीच्या लाह्या आणि खडीसाखर ह्यांचा लाडू द्यावा. हा समाधानकारक आहे.