पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण १८ वें. २३१ mawwwmmmmmmmmmwwwmnnar wwwmmmmmmmmmmmmmmmm अडकून राहिला असतां तो दुधाबरोबर बाळाच्या पोटांत जाऊन वेदना करतो. चोखणी लांब असावी. इतकी की ती उलटून धुतां येईल. ती कामांत नसेल तेव्हां ऊन पाण्यात घालून ठेवावी. तसेंच रबरी झांकण, आणि ह्या दोन्ही जिनसा कामांतल्याशिवाय काहीं शिलकीसही असाव्या. मिश्रण जेव्हा जेव्हां द्यावयाचे तेव्हां त्याची बाटली कढत पाण्यांत धरून ते कोंबट झाले झणजे द्यावे, ते प्रत्यक्ष अग्नीवर तापवू नये. किंवा थंड देऊ नये. त्याची साधारण उष्णता ९८ डिग्री असावी. थोडक्यात सांगावयाचे ह्मणजे मुलाच्या पोषणाच्या संबंधांत पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावें: १ मुलाला गाईचें स्वच्छ, शुद्ध आणि ताजे दूध द्यावें. ज२ दुधांत साखर घालावयाची ती दुधापासून काढलेली मिळेल तोवर चांगली. ३ अन्न नियमित प्रमाणांत नियमित वेळी द्यावें. - ४ वाजवीपेक्षां ज्यास्त अन्न किंवा दूध घालू नये; कमी घालून मुलाची उपासमारही करूं नये. ५ दुधाची भांडी, बाटली, चोखणी वगैरे स्वच्छ ठेवावी. ६ मुलाला जे काही खाऊ घालावयाचे किंवा पाजावयाचें तें मनुष्याच्या अंगांतल्या ह्मणजे ९८ डिग्री उष्णतेइतकें गरम असावें. ७ प्रत्येक आठवड्याला मुलाचे वजन करून त्या वजनाचें टिपण ठेवावें. ८ मुलाला पचन होते की नाही यावर नेहमीं नजर ठेवावी. तें