पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२३० घरांतली कामें, mmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm आणि कांहीं दुधाबरोबर देण्याची असतात. दुसऱ्या प्रकारची अन्ने तान्हें मूल नऊ महिन्यांचे होईपर्यंत त्यास देणे केवळ अनवश्यक आहे एवढेच नाही, तर अपायकारकही आहे. पहिल्या प्रकारची अन्ने तान्ह्या मुलाला देण्यायोग्य असतात. परंतु असें अन्न देणें तें ताजे दूध मिळण्याची सोय होणे अशक्यच असेल तेव्हां-केवळ अडचणीच्या प्रसंगी-दिले पाहिजे. अशा अन्नांत ' एलनबरी ' नं. १ मूल दोन तीन महिन्यांचे होईपर्यंत द्यावें. तीन महिन्यावरील मुलाला 'एलनबरी' नं. २ आणि ' हॉर्लिक ' चे मॉल्टेड मिल्क ही फार योग्य आहेत, ही तिन्हीं अन्ने देतांना त्यांत पाणी मिसळावे लागते. दुधाबरोबर द्यावयाकरितां जी अन्ने तयार करतात, ती धान्याच्या सत्त्वाची असतात. त्यांत दुधाचा लेशही नसतो. अशा अन्नांत ' मेलिन्स फूड ' आणि होविस नं. १, बेंजरचे फूड, आणि एलनबरी नं. २ ही प्रमुख आहेत. दुधाची बाटली.- दूध पाजण्याची लांब नळीची बाटली आतां वाईट ठरविण्यात आली आहे. आजकाल नावेच्या आकाराची ऐकनबरीची बाटली उत्तमापैकी समजली जाते. हिला दोन्हीकडे तोंडे असतात. एका तोंडास रबरी झांकण आणि दुसऱ्यास चोखणी घालावयाची असते. चोखणीचे छिद्र मोठे असता कामा नये. तें मोठे असले तर मूल सपाट्याने दूध ओढून घेतें. ते त्यास विकार करते. दूध सावकाश पिण्यास निदान १५ मिनिटे लागली पाहिजेत. दूध पिणे झाल्यावर बाटलीत दूध राहिल्यास बळें पाजू नये. ते टाकून द्यावें. रिकामी बाटली चोखू देऊ नये, त्यापासून पोटांत वारा धरतो. बाटली, झांकण, आणि चोखणी ही आंतून बाहेरून स्वच्छ कढत पाण्याने धुवावी. केसांचा ब्रश वापरू नये. कारण एकादा केस कोठे