पान:संसार (भाग १) - घरांतलीं कामें.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

२२९ rammarha wwwwwwwwwwwww प्रकरण १८ वें. mmmmmmmmmm वावी, किंवा मेलिनचे किंवा दुसरें एकादें फुड ( सिद्धान्न ) दुधाबरोबर द्यावें.' परंतु असे करण्यास पुष्कळ स्त्रियांचे धैर्य सहसा होत नाही. त्यांना भीति वाटते की ह्यापासून मुलास शैत्यविकार होतील, हगवण लागेल, पोटांत वायु धरील, पाणी मिळविल्यावर दुधाचे दूधपण ते काय राहिले आणि त्याने मुलाचे पोट कसे भरणार ? त्या ह्मणतात की इंग्रजांच्या मुलांस इंग्लंड देशांत असें दूध मानवत असेल, त्यांचे पिंड मद्यमांसाहाराचे, त्यांचा मुलुख थंड, त्यांची गोष्ट निराळी, ते आपल्या देशांत कसें मानवेल ? डॉक्टरचें औषध देत असतां त्यांचे सल्याप्रमाणे दूध दिले तर हरकत नाहीं असें कोणी त्यांस सांगितल्यास त्या तसे करतात. पण तें डॉक्टरचें औषध चालू असेपर्यंत, आणि तेही अनमानीतच करतात. . घट्ट केलेले दूध ( कंडेन्स्ड मिल्क )-हें दूध त्यांतलें ? पाणी यंत्रसाह्याने तापवून वाफेच्या द्वारा घालवून तयार केलेले असते जसे दूध निरनिराळया गुणधर्माचें असतें तसे हे घट्ट केलेले दूधही निरनिराळया गुणधर्मांचे असते. ह्याशिवाय ही दुधे कांहीं निर्भेळ असतात, काहींमध्ये साखर मिसळलेली असते, आणि काही चिकणाई काढून टाकलेली असतात. ह्यांतल्या कोणत्याही प्रकारचे दूध देणे झाले तर ते गाईच्या स्वाभाविक दुधाच्या सारखेंच पातळ करून दिले पाहिजे. अशा धट्ट केलेल्या दुधांत । नेसल्स ' आणि ' मिल्क मेड' ची दुधे उत्तमांपैकीं समजली गेली आहेत. या - इतर सिद्ध केलेली अन्ने.-तान्ह्याकरितां आणखीही कितीएक सिद्ध केलेली अन्ने बाजारांत मिळतात. त्यांतली कांहीं गाईच्या दुधाऐवजी